Rubber Cultivation : दक्षिण गुजरातचे आता रबर लागवडीचे लक्ष

Rubber Production : केरळ राज्यात रबर हे महत्त्वपूर्ण पीक आहे. देशात उत्पादित होणाऱ्या ८३९ हजार टन नैसर्गिक रबरमधील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा एकट्या केरळ राज्याचा आहे.
Rubber Farming
Rubber FarmingAgrowon

Rubber Farming : लागवडीस पोषक हवामान आणि जमीन असलेल्या दक्षिण गुजरात मध्ये रबर लागवडीस प्राधान्य दिले जाणार आहे. याकरिता नवसारी कृषी विद्यापीठाने विविध संशोधन केंद्रांवर याबाबतचे प्रात्यक्षिक सुरू केले असून यास यश येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल यांनी दिली आहे.

केरळ राज्यात रबर हे महत्त्वपूर्ण पीक आहे. देशात उत्पादित होणाऱ्या ८३९ हजार टन नैसर्गिक रबरमधील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा एकट्या केरळ राज्याचा आहे. केरळनंतर त्रिपुरा, तमिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो.

नैसर्गिक रबरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, यादृष्टीने रबर उत्पादनही वाढविण्याची आवश्‍यकता आहे. याच गरजेचे संधीत रूपांतर करण्याकरिता गुजरातच्या दक्षिण भागात रबर लागवडीस प्रोत्साहन देण्याचे ठरले आहे.

Rubber Farming
Rubber Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबर लागवडीकडे कल

याबाबत अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. पटेल म्हणाले,‘‘दक्षिण गुजरात आणि केरळमधील बहुतांश रबर निर्मिती क्षेत्र १९.१ कृषी पर्यावरणीय उपक्षेत्र (ए.एस.आर)मध्ये मोडतात.

या भागांमध्ये गरम-ओलसर हवामान मध्यम ते जास्त चिकण मातीमध्ये मिसळलेली लाल-काळी माती सारखी जमीन तसेच मध्यम ते जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याची क्षमता आहे.

Rubber Farming
Rubber Cultivation: कोल्हापूर जिल्ह्यात रबर लागवड होणार

दक्षिण गुजरात आणि केरळ राज्याचे वातावरण जवळ-जवळ सारखेच असल्यामुळे तेथील पिकांचे येथे सहजपणे उगवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोट्टायम (केरळ) येथील रबर बोर्ड आणि नवसारी कृषी विद्यापीठ यांच्यात २०२२मध्ये सामंजस्य करार झाला होता. यानंतर दक्षिण गुजरातमध्ये रबर लागवडीसाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.’’

दक्षिण गुजरात मधील भरूच, नर्मदा, तापी, नवसारी, सुरत, वलसाड आणि डांग जिल्ह्यांमध्ये नवसारी कृषी विद्यापीठाच्या १४ संशोधन केंद्रावरती आरआरआयआय-४३० या रबर जातीच्या १२०० रोपांची लागवड करण्यात आली आहे.

या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने प्रारंभिक स्तरावर रबर बोर्डचे कार्यकारी संचालक जे.के. एन. राघवन यांनी बांध आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रात लागवडीस अनुकूलता दर्शविली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com