Weather Update : नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय

या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
 Weather Update
Weather UpdateAgrowon

महाराष्ट्रावर आजपासून (ता.११) हवेचे दाब १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. तेथील हवेचे दाब उद्या (ता.१२) पासून ते आठवडा अखेरपर्यंत कमी राहतील. त्यामुळे त्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहणार आहे. वाऱ्याची दिशा कोकण, मराठवाडा व दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून राहण्यामुळे मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय राहील. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येईल. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. १ जून रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्याच्या काळात गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यातही सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. एकूणच पावसाचे प्रमाण या तीन महिन्यात चांगले झाले असून काही भागात अतिवृष्टीने पिकांचे नुकसानही झाले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सरासरीचे जवळपास अथवा अधिक पाऊस झाला आहे.

 Weather Update
Monsoon : हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ? | ॲग्रोवन

कोकण ः
आज (ता.११) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात २२ मिमी, रायगड जिल्ह्यात २७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.१२) सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ४० मिमी, रायगड जिल्ह्यात ४० मिमी तर ठाणे व पालघर जिल्ह्यात ४३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढून तो १७ ते ३० किमी राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
आज (ता.११) नाशिक जिल्ह्यात ६७ मिमी, धुळे जिल्ह्यात ५२ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात ७० मिमी व जळगाव जिल्ह्यात ३२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.१२) नाशिक जिल्ह्यात ४३ मिमी, धुळे जिल्ह्यात २३ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात ७५ मिमी व जळगाव जिल्ह्यात २७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक व धुळे जिल्ह्यात नैऋत्येकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील.

मराठवाडा ः
आज (ता.११) उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ४० मिमी, लातूर व बीड जिल्ह्यात २७ ते ३० मिमी, परभणी व जालना जिल्ह्यात ३२ ते ३६ मिमी आणि औरंगाबाद जिल्ह्यात ९ मिमी पावसाची शक्‍यता. उद्या (ता.१२) उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात १५ ते १६ मिमी, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात २३ मिमी व औरंगाबाद जिल्ह्यात ४२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व परभणी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २४ ते ३० किमी तर जालना, नांदेड जिल्ह्यात १७ ते १८ किमी राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८७ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
आज (ता.११) बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ४० ते ४३ मिमी, अमरावती जिल्ह्यात ७३ मिमी व वाशीम जिल्ह्यात २५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.१२) अमरावती जिल्ह्यात ३४
मिमी, अकोला जिल्ह्यात २१ मिमी, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात २७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग १० ते १४ किमी राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८४ टक्के राहील.

 Weather Update
कृषी उत्पादनासमोर हवामान बदलाचे संकट!

मध्य विदर्भ ः
आज (ता.११) यवतमाळ जिल्ह्यात ५२ मिमी व वर्धा व नागपूर जिल्ह्यात २७ ते ३० मिमी पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.१२) यवतमाळ जिल्ह्यात ४४ मिमी तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ११ ते १२ किमी राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७६ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः
आज (ता.११) चंद्रपूर जिल्ह्यात ५२ मिमी, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात २३ ते २४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.१२) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४० ते ४६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७६ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः
आज (ता.११) व उद्या (ता.१२) कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ६० ते ७० मिमी तर सातारा, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात प्रतिदिन ३० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २७ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २९ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९१ टक्के राहील.
------------------------
कृषी सल्ला ः
१) खरिपातील सर्व पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे. मात्र, शेतात साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करावा.
२) भातखाचरात ५ सेमी उंचीपर्यंत पाणी साठवावे.
३) करडईची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करावी.
६) फळबागेमध्ये हस्त बहार धरण्याचे नियोजन सुरू करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com