Rabi Jowar : रब्बीत गल्ले बोरगाव हे ‘सुपर मोती’चे करा

Aurangabad News: गावात ‘वनामकृवी’ संशोधित ५० एकर क्षेत्रावर सुपरमोती या वाणाची लागवड केलेली आहे. या शिवाय कृषी विभागाच्यावतीने पीक प्रात्यक्षिकेही देण्यात आलेली आहेत.
Rabi Sowing Aurangabad News
Rabi Sowing Aurangabad NewsAgrowon

अनेक शेतकऱ्यांनी सुपर मोती (Super Moti Jowar) या वाणाच्या उत्पादन (Jowar Production) आणि चारा (Animal Fodder) या दोन्हीही बाबी चांगल्या आहेत. शिवाय मार्केटला इतर वानापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे.

रब्बीत (Rabi Jowar Verity) या वाणाची पेरणी (Jowar Sowing) करत आपले गाव (Village) सुपरमोती स्पेशल करा, असा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला.

गल्ले बोरगाव ता. खुलताबाद येथील ज्ञानेश्वर भगत यांच्या शेतावर ‘वनामकृवी’ संशोधित रब्बी ज्वारीचा (Jwari) सुपर मोती शेतीदिन आयोजित केला होता.

यावेळी डॉ. पवार मार्गदर्शन करत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी खुलताबाद शिरीष घनबहादूर, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, सरपंच विशाल खोसरे आदींसह प्रगतशील शेतकरी तुळशीराम औटे, किशोर खोसरे, श्याम खोसरे, पांडुरंग वेताळ, संतोष चंद्रटिके, कारभारी ठेंगडे यांच्यासह सुपरमोती या वाणाची लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात ‘वनामकृवी’ संशोधित ५० एकर क्षेत्रावर सुपरमोती या वाणाची लागवड केलेली आहे. या शिवाय कृषी विभागाच्यावतीने पीक प्रात्यक्षिकेही देण्यात आलेली आहेत.

यामध्ये ज्वारीचा इतर वाणाचा समावेश आहे. रामेश्वर ठोंबरे म्हणाले, की विद्यापीठ निर्मित संशोधित ज्वारी सुपर मोती या वाणाची मोठी मागणी रब्बी २०२२ या हंगामात शेतकऱ्यांनी केली. मागील दोन वर्षी या गावात या वाणांनी चांगले उत्पादन दिले.

Rabi Sowing Aurangabad News
Rabi Crop Competition : शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पीकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

तालुका कृषी अधिकारी धनबहादूर म्हणाले, की या गावात दोन विद्यापीठाचे रब्बी ज्वारीचे सुधारित वाण दिलेले आहे. खुलताबाद तालुक्यातील हे एक महत्त्वाचे रब्बी ज्वारी पिकविणारे गाव आहे.

हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षात या शिवाराचे महत्त्व अधोरेखित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. बी. धबाले यांनी तर आभारप्रदर्शन श्याम खोसरे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com