Soybean : सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने ओलांडला सरासरी क्षेत्राचा टप्पा

हिंगोली जिल्ह्यातील स्थिती; एकूण २ लाख १४ हजारांवर हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) गुरुवार (ता. ७) पर्यंत २ लाख ९० हजार ५५६ हेक्टरवर पेरणी (Kharif Sowing) झाली आहे. सोयाबीनचे (Soybean Sowing Area) सरासरी क्षेत्र १ लाख ६८ हजार ४३४ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख १४ हजार ५१६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आजवर जिल्ह्यात झालेल्या एकूण पेरणी क्षेत्रामध्ये एकट्या सोयाबीन पिकांचे (Soybean Crop Acreage) क्षेत्र ७३.९० टक्के एवढे आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख २४ हजार ५८९ हेक्टर असून गुरुवार (ता. ७) पर्यंत सोयाबीनची १ लाख ६८ हजार ४३४ पैकी २ लाख १४ हजार ५१६ हेक्टर (१२७.०३ टक्के) पेरणी झाली. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. वसमत, सेनगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली. जिल्ह्यात कपाशीची ८३ हजार ७३० पैकी २८ हजार ७२९ हेक्टर (३४.३१ टक्के) लागवड झाली.तुरीची ५९ हजार ४११ पैकी ३३ हजार २३१हेक्टर (५५.९३ टक्के),मुगाची ३३ हजार ३९९ पैकी ५ हजार ६५६ हेक्टर (१६.९३ टक्के), उडदाची १५ हजार ८८८ पैकी ४ हजार १४७ हेक्टर (२६.१० टक्के) पेरणी झाली.एकूण कडधान्यांची १ लाख १६ हजार ७०६ पैकी ४३ हजार ५३ हेक्टरवर (३६.८९ टक्के) पेरणी झाली.

Soybean Sowing
Soybean & Maize: सोयाबीन, मका आश्वासक राहण्याची चिन्हे

ज्वारीची ४७ हजार ५४४ पैकी ३ हजार ४८० हेक्टर (७.३२ टक्के), मक्याची १ हजार ९७१ पैकी ३०९ हेक्टरवर (१५.६७ टक्के) पेरणी झाली आहे. आजवर झालेल्या एकूण पेरणी क्षेत्रात हिंगोली तालुक्यात ३८ हजार ५०५ पैकी ६४ हजार ४४८ हेक्टर (१६७.४८ टक्के), कळमनुरी तालुक्यात ७४ हजार १११ पैकी ६० हजार ९७५ हेक्टर (८२.२८ टक्के), वसमत तालुक्यात १ लाख ३९ हजार ७९६ पैकी ५२ हजार ८०९ हेक्टर (३७.७८ टक्के), औंढा नागनाथ तालुक्यात ८३ हजार ८८४ पैकी ५६ हजार ६२४ हेक्टर (६७.५०टक्के), सेनगाव तालुक्यात ८८ हजार २९२ पैकी ५५ हजार ६६० हेक्टर (६३.०४ टक्के) पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय सोयाबीन पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका...सरासरी क्षेत्र...पेरणी क्षेत्र...टक्केवारी

हिंगोली...५५२९...५१९२८...९३९.१४

कळमनुरी...२६१३५...५०२४०...१९२.२३

वसमत...४१८२९...३२१००...७६.९३

औंढा नागनाथ...३१४२२...३८६६०...१२३.०३

सेनगाव...६३५१७...४१५८८...६५.४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com