Rabi Season : जालना जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू पेरणी अधिक

करडई, सूर्यफूल आणि जवसाचे तेल आरोग्यदायी मानले जाते. मात्र, बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

जालना : करडई, सूर्यफूल आणि जवसाचे तेल आरोग्यदायी (Healthy) मानले जाते. मात्र, बदलत्या पीक (crop) पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. जालना जिल्ह्यात पेरणी झालेल्या रब्बी क्षेत्रात नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Rabi Season
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

जालना जिल्ह्यात करडई २२ हेक्टरवर आहे. तीळ, सूर्यफूल, जवस ह्या पिकांची लागवड जिल्ह्यात अद्याप निरंक आहे. यंदा बाजारात करडईची भाजीही फारशी दिसून आली नाही. रब्बी व उन्हाळी म्हणून घेतले जाणारे सूर्यफुलाचे पीक, तीळ आणि जवस इत्यादी पीक जालना जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले जवस हे पीक आहे. या पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातही उत्तम उत्पादन देणाऱ्या ‘लातूर जवस-९३’ हे वाण लातूर येथील गळितधान्य संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आले आहे.

परभणी येथे झालेल्या ‘ॲग्रेस्को’मध्ये या वाणाची महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली. करडईच्या तेलात औषधी गुण असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर वापरतात. करडईची पाने पाचक असतात. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. जवसामध्ये ‘ओमेगा-३’ या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८ टक्के असते.

त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत. जवस रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. त्याचप्रमाणे जवस हे अतिशय पौष्टिक असून त्यामधून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवसाच्या तेलात ५८ टक्के ओमेगा-३,ओमेगा-६, कोलेस्ट्रोल आणि अँटिऑक्सिडंट आहेत.

जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के खाद्यतेल म्हणून, तर ८० टक्के तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी, तसेच जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी वापरतात. जवसाच्या कड्यापासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे त्याचा पिशव्या, कागद व कपडे तयार करण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवस, करडई तीळ व सूर्यफूल लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले.

जालना जिल्ह्यातील रब्बी पेरणी (हेक्टर)

ज्वारी ४४७१३

गहू २४३४२

मका ६४७५

हरभरा ४९०९७

करडई २२

जवस ००

तीळ ००

सूर्यफूल २.४

इतर १६

एकूण पेरणी १२४६६७.४

सरासरी पेरणी ५७.२२ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com