Kharif Sowing : देशात पेरणीने घेतला वेग

मागील पंधरवाड्यात देशभरात चांगला पाऊस (Good Rain) झाला. त्यामुळे देशातील खरिप पेरण्यांनी (Kharif Sowing) वेग घेतला. ८ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा माघरला होता.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणेः मागील पंधरवाड्यात देशभरात चांगला पाऊस (Good Rainfall) झाला. त्यामुळे देशातील खरिप पेरण्यांनी (Kharif Sowing) वेग घेतला. ८ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा माघरला होता. मात्र १५ जुलैपर्यंत पेरणीने (Sowing) मागील वर्षातील आकडा पार केला. मागीलवर्षी १५ जुलैपर्यंत ५९१ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झोला होता. मात्र यंदा ५९२ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाखाली आले.

Kharif Sowing
Heavy Rain चा खरीप पिकांना फटका बसतोय का ? | ॲग्रोवन| Agrowon

खरिपातील महत्वाच्या भाताखालील क्षेत्र मात्र 17.4 टक्क्यांनी कमी झाले. आतापर्यंत भात पेरणी १२८.५० लाख हेक्टर झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १५५.५३ लाख हेक्टर होती. 8 जुलैपर्यंत पेरणी 24 टक्क्यांनी घटली होती परंतु गेल्या आठवडाभरात भाताचे एकरी क्षेत्र सुधारले या महिन्यात पडणारा पाऊस भातपिकातील एकरी घट भरून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर कडधान्य ९ टक्क्याने वाढला. कडधान्य लागवड 66.69 लाख हेक्टरवरून 72.66 लाख हेक्टरपर्यंत पोचली. भरडन्याचा पेरा ८ टक्क्यांनी वाढला. भरडधान्यांचे पेरणी क्षेत्र ८७.०६ लाख हेक्टर वरून ९३.९१ लाख हेक्टर झाले.

Kharif Sowing
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

तेलबियांची लागवड ७.३८ टक्क्यांनी सुधारला. तेलबियांचे क्षेत्र 124.83 लाख हेक्टरवरून 134.04 लाख हेक्टर झाले आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे क्षेत्र 90.32 लाख हेक्टर होते. ते 10 टक्क्यांनी वाढून 99.35 लाख हेक्टरवर पोचले. कापसाचे क्षेत्रही 96.58 लाख हेक्टरवरून 6.44 टक्क्यांनी वाढून 102.8 लाख हेक्टर झाले. उसाच्या क्षेत्र 53.70 लाख हेक्टर वरून 53.31 लाख हेक्टर इतके कमी झाले आहे.

जूनमध्ये माॅन्सून सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भात हे खरीपाचे प्रमुख पीक आहे.

तेलबियांची पेरणी वाढल्याने देशासाठी चांगलेच आहे. कारण यामुळे देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊ शकते आणि किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्याबरोबरच आयात कमी होऊ शकते. भारत खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. 12 जुलै रोजी कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत खरीप पिकांच्या पेरणीत काही उशीर झाला होता, परंतु ही चिंतेची बाब नाही. मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसे या महिन्यात ते कव्हर केले जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com