Chana Sowing : हरभऱ्याची ३ लाख हेक्टरवर पेरणी

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील स्थिती; एकूण रब्बी क्षेत्रात हरभऱ्याचा पेरा ६३.९० टक्के
Chana Sowing
Chana SowingAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः परभणी-हिंगोली जिल्ह्यांत हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ३२ हजार ३१८ हेक्टर आहे.

परंतु या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ६)पर्यंत या दोन जिल्ह्यांत हरभऱ्याची ३ लाख ६ हजार ६८३ हेक्टरवर (१३२.०१ टक्के) पेरणी (Chana Sowing) झाली आहे.

या दोन्ही जिल्ह्यांतील यंदाच्या रब्बीच्या क्षेत्रात एकट्या हरभऱ्याचे क्षेत्र ६३.९० टक्के एवढे आहे. परभणी जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत ४३ हजार ६३० हेक्टरने वाढ झाली आहे.

दरम्यान, या दोन जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४७ हजार ६८५ हेक्टर असताना शुक्रवारपर्यंत रब्बीची एकूण ४ लाख ७९ हजार ९२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख  ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता.६)पर्यंत ३ लाख २ हजार ८१७ हेक्टरवर (१११.८३ टक्के) पेरणी झाली.

Chana Sowing
Chana Sowing : दीड लाख हेक्टरवर होणार हरभऱ्याची पेरणी

त्यात ज्वारी, गहू आदी तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख २१ हजार ६५४  हेक्टरवर  (७८.५५ टक्के) पेरणी झाली आहे.

कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ असताना १ लाख ७९ हजार ७७८ हेक्टरवर (१६०.१३ टक्के) पेरणी झाली. करडई, जवस आदी गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार ३८४ हेक्टरवर (३८ टक्के) पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर असताना १ लाख ७७ हजार ११० हेक्टर (१००.१२ टक्के) पेरणी झाली.

त्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ४६ हजार ६७० हेक्टर (८९.२१ टक्के) पेरणी झाली. कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख २७ हजार १२३ हेक्टरवर (१०५.६१ टक्के) पेरणी झाली.

गळीत धान्यांची ८४२ पैकी ३१६ हेक्टर (३७.५८ टक्के) पेरणी झाली आहे.

Chana Sowing
Rabi Sowing : रब्बीची २ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी

१३ तालुक्यांत हरभऱ्याचा पेऱ्यात वाढ...


परभणी जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० असताना यंदा आजवर १ लाख  ७९ हजार ६८९ हेक्टर (१६०.१९ टक्के) पेरणी आहे.

हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ हेक्टर असताना यंदा १ लाख २६ हजार ९९४ हेक्टर (१०५.७ टक्के) पेरणी झाली.

या दोन जिल्ह्यांतील १४ पैकी १३ तालुक्यांत हरभऱ्याची सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कळमनुरी तालुक्यात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र कमी दिसत
आहे.

तालुकानिहाय हरभरा पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)(शुक्रवार ता. ६ पर्यंत)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी २५००० ३७८४६ १५१.३८
जिंतूर ३२९८० ४६७८० १४१.८४
सेलू १०६३५ १८७४५ १७६.२५
मानवत ५७९३ ९७२१ १६७.८१
पाथरी ४२५६ ९००८ २११.६१

सोनपेठ ६९०३ ९२०६ १३३.३५
गंगाखेड १११८६ १३४९८ १२०.६७
पालम ५७६१ ७२०० १२४.९७
पूर्णा ९६५४ २७६८५ २८६.७७
हिंगोली २२०१७ २५३०० ११४.९१
कळमनुरी ३८२४९ २५७१४ ६७.२३

वसमत १९५२४ २३११२ ११८.३८
औंढानागनाथ १६९७८ २७७५० १६३.४५
सेनगाव २३३७९ २५११८ १०७.४४
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी २५००० ३७८४६ १५१.३८
जिंतूर ३२९८० ४६७८० १४१.८४
सेलू १०६३५ १८७४५ १७६.२५
मानवत ५७९३ ९७२१ १६७.८१

पाथरी ४२५६ ९००८ २११.६१
सोनपेठ ६९०३ ९२०६ १३३.३५
गंगाखेड १११८६ १३४९८ १२०.६७
पालम ५७६१ ७२०० १२४.९७
पूर्णा ९६५४ २७६८५ २८६.७७

कळमनुरी ३८२४९ २५७१४ ६७.२३
वसमत १९५२४ २३११२ ११८.३८
औंढानागनाथ १६९७८ २७७५० १६३.४५
सेनगाव २३३७९ २५११८ १०७.४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com