Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची ३९ हजार हेक्टरवर पेरणी

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ११) पर्यंत एकूण ३९ हजार ७९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Rabbi Season
Rabbi Season Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabbi Season) शुक्रवार (ता. ११) पर्यंत एकूण ३९ हजार ७९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र २३ हजार ६९ हेक्टर आहे. जिल्ह्यात उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबली आहे.

पावसामुळे तण वाढले आहे. त्यामुळे पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी वेळ लागत आहे. सखल भागातील जमिनीवर अजूनही वाफसा नाही. त्यामुळे पेरणी रखडत चालली आहे. यंदाही शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे अधिक दिसत आहे. शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १६ हजार ४९६ हेक्टरवर (१०.६५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचा पेरा अधिक आहे.

Rabbi Season
Crop Insurance : ‘आठ दिवसांत पीक विमा रक्कम जमा करा’

कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी २३ हजार ७६ हेक्टरवर (२०.५५ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. करडई, जवस, तीळ, गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी २२६ हेक्टरवर (६.२ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या काही दिवसांत अनेक भागांत पेरणीने वेग घेतल्याचे दिसत आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) शुक्रवार ता. ११ पर्यंत

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ११३०८९ १५३३१ १२.५६

गहू ३०३०८ १०२० २.५९

हरभरा ११२१७० २३०६९ २०.५७

करडई ३३७१ २०९ ६.२

जवस ११९ १४ ११.७६

तीळ ३३.६४ ३ ८.९२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com