Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी सुरूच

खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरूच आहे. मका लागवड वाढल्याने गव्हाखालील क्षेत्र दीड ते दोन हजार हेक्टरने घटू शकते, असे दिसत आहे.
Rabi season
Rabi seasonAgrowon

जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील (Rabi season) पिकांची पेरणी सुरूच आहे. मका लागवड वाढल्याने गव्हाखालील क्षेत्र दीड ते दोन हजार हेक्टरने घटू शकते, असे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सव्वादोन ते अडीच लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, असे दिसत आहे. धुळ्यात सुमारे ७० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारात ४० ते ५० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल, असे दिसत आहे.

Rabi season
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

यात हरभऱ्याची पेरणी खानदेशात पूर्ण झाली आहे. ही पेरणी सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे. तर उर्वरित क्षेत्र धुळे व नंदुरबारात आहे. मका लागवड, गहू पेरणी सुरूच आहे. पुढील १० ते १२ दिवस मका व गहू पेरणी सुरू राहील. मक्याची खानदेशात मिळून ५५ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. तर खानदेशात गव्हाची सुमारे ३० ते ३२ हजार हेक्टरवर पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे १७ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होईल. उर्वरित क्षेत्र धुळे व नंदुरबारात असणार आहे.

नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, रावेर भागांत गहू पीक अधिक आहे. अनेकांनी पिकात तीनदा सिंचन केले आहे. त्यास एकदा रासायनिक खताचा डोसही देण्यात आला आहे. यामुळे गहू पीकही बऱ्यापैकी आहे. मका पिकात सध्या अमेरिकन लष्करी अळी दिसत नसल्याची स्थिती आहे. परंतु शेतकरी खबरदारी घेत आहेत.

दादर ज्वारी जोमात

हरभरा खानदेशात हुकमी कोरडवाहू रब्बी पीक आहे. तसेच कोरडवाहू दादर ज्वारीची देखील पेरणीदेखील खानदेशात बऱ्यापैकी आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारीचे पीक असते. ही पेरणी सुमारे ४० हजार हेक्टरवर झाली आहे. यापाठोपाठ पुढे १० ते १५ दिवसांत संकरित ज्वारीची देखील कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी पेरणी करतील.

Rabi season
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

यामुळे दादर ज्वारी व संकरित ज्वारीचे क्षेत्र मिळून सुमारे ६० ते ६५ हजार हेक्टरवर असणार आहे. दादर ज्वारीचे पीक जोमात आहे. त्यात विरळणीचे काम झाले आहे. खते, सिंचनाशिवाय हे पीक येते. त्यामुळे त्याला शेतकरी पसंती देतात. दादर ज्वारीचा चारा मका, संकरित ज्वारीच्या तुलनेत महाग असते. मागील हंगामात तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिशेकडा या दरात दादर ज्वारीचा कडबा किंवा चारा शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना घ्यावा लागला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com