
सांगली ः जिल्ह्यातील रब्बी हंगामात (Rabi Season) १ लाख ६ हजार ०५३ हेक्टरवर झाली असून, ८५ टक्क्यांवर पेरा (Sowing) झाला आहे. गहू, हरभरा पिकांची पेरणी (Chana Sowing) सुरू असून, रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ०५३ हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला गती आली आहे.
सध्या गहू, हरभरा या पिकांची पेरणी सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचत काही भागांत हलका पाऊस झाला, या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत रब्बी ज्वारीची पेरणी उरकली आहे. जत तालुक्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ९१९ हेक्टर असून, त्यापैकी ५७ हजार ८६० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. जत तालुक्यात ज्वारीचा पेरा अधिक झाला आहे. जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २१ हजार ४५३ हेक्टर असून, ११ हजार ६७६ हेक्टरवर म्हणजे ५४ टक्के पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय पेरणी स्थिती (क्षेत्र -हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज २२६६८
जत ७१०२८
खानापूर ४८५०
वाळवा ५४६१
तासगाव ८४०५
शिराळा ३९३८
आटपाडी १८५७०
कवठेमहकांळ १८०९२
पलूस १९५०
कडेगाव ८०५६
एकूण १ लाख
६ हजार ०५३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.