Summer Sowing : सांगलीत एक हजार हेक्टरवर उन्हाळी पीक पेरा

जत आणि आटपाडी तालुक्यात सर्वाधिक मका पिकाचे क्षेत्र आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पीक घेतले जाते.
Sowing
SowingAgrowon

Sangli News : जिल्ह्यात उन्हाळी पेरणी सुरू झाली असून आतापर्यंत ९९५ हेक्टरवर पेरा झाला आहे. मका पिकाची सर्वाधिक पेरा झाला आहे. यंदा उन्हाळी हंगामातील (Summer Crop Season) सोयाबीनचा पेरा घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पिकांची सरासरी क्षेत्र ३५१८ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात उन्हाळी मका, भुईमूग, तृणधान्यासह अन्य पिकांची पेरणी केली जाते. वास्तविक दुष्काळी पट्ट्यातील जत, खानापूर, तासगाव, आटपाडी यांसह इतर तालुक्यांत मका पिकाची पेरणी केली जाते.

Sowing
Summer Sowing : पुणे विभागात उन्हाळी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू

जत आणि आटपाडी तालुक्यात सर्वाधिक मका पिकाचे क्षेत्र आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पीक घेतले जाते. सध्या मक्याची ६३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर भुईमुगाचा पेरा २९७ हेक्टरवर झाला आहे.

गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपात सोयाबीनच्या बियाणांची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लावण्याकडे कल वाढला होता; मात्र, गतवर्षी सोयाबीन पिकास पोषक वातावरण मिळाले नाही.

त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामात मिरज तालुक्यात १५ त र वाळवा तालुक्यात ५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Sowing
Summer Moong Sowing : उन्हाळी मूग लागवडीबाबत पळसखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग

उसाच्या क्षेत्रात वाढ

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात ६९ हजार ९१ हेक्टरवर उसाची लागवड होती. जिल्ह्यात आडसाली उसाची लागवड ४२ हजार ७९० हेक्टर, पूर्व हंगामी १६ हजार ६४४ हजार हेक्टर सुरू २ हजार ३१० हेक्टर तर खोडवा १४ हजार ५९३ हेक्टर अशी एकूण ७६ हजार ३३७ हेक्टर नोंद आहे.

सुरू आणि खोडवा या हंगामातील उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे. जिल्ह्यातील उसाचे अंतिम क्षेत्र मे महिन्यात स्पष्ट होईल. त्यावर यंदा लागवडीचे क्षेत्रात घट होणार की वाढ होणार याची स्पष्टता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com