Rabbi Season : तीन जिल्ह्यांत २ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत १० ऑक्टोबर अखेर केवळ २ लाख ३० हजार २८४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३१ टक्के आहे.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत १० ऑक्टोबर अखेर केवळ २ लाख ३० हजार २८४ हेक्टरवर रब्बीची (Rabbi) पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३१ टक्के आहे.

Rabbi Season
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख ३० हजार २८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रात रब्बी ज्वारीची १ लाख २५ हजार ३३८ हेक्टरवर, गव्हाची १९६३८ हेक्टरवर, मक्का ६७४५ हेक्टरवर, इतर तृणधान्य २९८ हेक्टरवर, हरभरा ७६ हजार २५ हेक्टरवर, इतर कडधान्य १७५७ हेक्टरवर, करडई १०७ हेक्टरवर, सूर्यफुल २६४ हेक्टरवर इतर गळीत धान्य ४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाळ्याच्या अखेरच्या सत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जमीन रब्बीसाठी तयार करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्याचा थेट परिणाम रब्बीची पेरणी उशिराने होण्यावर झाला आहे.

Rabbi Season
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

जिल्हानिहाय रब्बी पेरणीचे सरासरी व प्रत्यक्ष क्षेत्र (हेक्टरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा

सर्वसाधारण क्षेत्र १९०९३५

प्रत्यक्ष पेरणी २०४९६.७०

टक्केवारी १०.७३

जालना जिल्हा

सर्वसाधारण क्षेत्र २१७८९२.२८

प्रत्यक्ष पेरणी ६३१७७

टक्केवारी २८.९९

बीड जिल्हा

सर्वसाधारण क्षेत्र ३३२३५३

प्रत्यक्ष पेरणी १४६६११

टक्केवारी ४४.११

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com