Kharif Sowing : मराठवाड्यात २७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी

अनेक भागांत पावसाच्या प्रदीर्घ उघडिपीमुळे पीक दुपारच्या वेळी माना टाकत असून, पावसाची नितांत गरज आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅक, शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

लातूर : विभागातील खरीप हंगामातील (Kharif Season) सरासरी क्षेत्र २९ लाख ३५ हजार ८४४ हेक्टर असून, २७ लाख ६२ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी (Kharif Sowing) झालेली आहे. अनेक भागांत पावसाच्या प्रदीर्घ उघडिपीमुळे पीक (Crop Damage) दुपारच्या वेळी माना टाकत असून, पावसाची नितांत गरज आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅक (Yellow Mosaic On Soybean), शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव (Snail Outbreak On Soybean) आढळून आला आहे. अतिवृष्टी व पुरामुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पुणे विभागात १०३ टक्के पेरणी

खरीप ज्वारी:लातूर विभागात खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून, आतापर्यंत ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या केवळ ३६ टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

तूर ः लातूर विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून, आतापर्यंत २ लाख ५८ हजार ४८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या ७४ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली होती. पावसाचा खंड पडल्यामुळे परिस्थिती काही अंशी सुधारत आहे. काही ठिकाणी मर व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडली आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात

मूग ः लातूर विभागात मुगाचे सरासरी क्षेत्र ९६ हजार ८३९ हेक्टर असून, आतापर्यंत ६१ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या ६४ टक्केच आहे. पीक सध्या शेंगा भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत असून, नांदेड जिल्ह्यात काही भागांत पिकाची काढणीस सुरवात झालेली आहे.

उडीद ः लातूर विभागात उडदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर असून आतापर्यंत ७५८९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ७७ आहे. पीक सध्या काही ठिकाणी फ़ुलोरा व बहुतांश ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

सोयाबीन ः लातूर विभागात सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून, आतापर्यंत १८ लाख ९८ हजार १६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी १२१ आहे. पीक सध्या फ़ुलोरा व काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडली आहेत. विभागातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये शंखीगोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी क्षेत्रीय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. लातूर जिल्ह्यात पिकावर अल्प प्रमाणात फ़ुले व शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सोयाबीन पिकामध्ये आंतरमशागतीचे कामे सुरू आहेत.

कापूस ः लातूर विभागात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असून, आतापर्यंत ४ लाख १० हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८५ आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पाते व फ़ुले लागण्याच्या अवस्थेत आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

सरासरीच्या ११७ टक्के पाऊस

लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ असून, २५ ऑगस्टपर्यंत ६१६.७६ मिलिमीटर इतका पाऊस झाला. ता. २५ ऑगस्टच्या सरासरीच्या ११७ टक्के असून, वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के इतका आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com