Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

मागील काही दिवसांपासून हवामान खाते सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, पाऊस तर आलाच नाही. परंतु कडक ऊन व दमट वातावरणामुळे पीक परिस्थिती बिकट झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

लोणी काळभोर, जि. पुणे ः पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या पेरण्यांसाठी (Kharif Sowing) पुरेसा पाऊस (Insufficient Rainfall) पडला नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या या पावसाअभावी लांबणीवर पडल्या आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

Kharif Sowing
Kharip Sowing: देशातील खरीप पेरणीची कशी स्थिती आहे ?

मागील काही दिवसांपासून हवामान खाते सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, पाऊस तर आलाच नाही. परंतु कडक ऊन व दमट वातावरणामुळे पीक परिस्थिती बिकट झाली आहे. इंधनाची दरवाढ झाल्याने यांत्रिकी मशागतीला अधिक खर्च, शिवाय खते व बियाण्यांचे वाढत्या भावामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी पैशांची साथ करून तर काहींनी कसाबसा पैसा उपलब्ध करून पेरणीसाठी कंबर कसली होती.

जिल्ह्यात पाऊस लांबला असल्याने, अद्याप पुरेशा प्रमाणात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही भागात जून महिन्याच्या मध्यात एक पाऊस झाला. खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.

दरम्यान, पेरणीयोग्य जोरदार पाऊस पडल्यानंतरच पेरण्या करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे. दुबार पेरण्यांचे संकट टाळण्यासाठी शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, पाऊस सातत्याने शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. यंदा चांगल्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असले तरी पावसाचे सातत्य व सर्वच भागांत सारख्या उपस्थितीचा अभाव शेतकऱ्यांची चिंता वाढवताना दिसत आहे.

पूर्व हवेलीमध्ये खरीप हंगामामध्ये तृणधान्य पिकांमध्ये बाजरीचे प्रामुख्याने ३४७ हेक्टर असून त्यापैकी १२१ हेक्टर म्हणजेच ३२ टक्के पेरणी झालेली आहे. कडधान्य पिकांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद यांची ७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उर्वरित पेरण्या चालू आहेत. हा भाग प्रामुख्याने बागायती असल्याने प्रामुख्याने ऊस व भाजीपाला पिकांचे खरीप हंगामामध्ये क्षेत्र जास्त आहे. सध्या दुबार पेरणीची गरज नाही.
गुलाब कडलग, मंडळ कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com