Rabi Sowing : रब्बी हंगामात १५ टक्क्यांनी वाढले पेरणीक्षेत्र

या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा कालावधी लांबल्याने खरिपातील पिकांची काढणी लांबली व रब्बी हंगामास विलंब झाला.
Chana Sowing
Chana SowingAgrowon

अमरावती : या वर्षीच्या रब्बी हंगामातील पेरणी (Rabi Sowing Acreage) क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा १५ टक्क्यांनी वाढले आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) दिलेल्या अंतिम पेरणी (Rabi Sowing) अहवालात जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ६११ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणीखाली हरभरा असून गव्हाचे क्षेत्र तुलनेने कमी आहे.

Chana Sowing
Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा कालावधी लांबल्याने खरिपातील पिकांची काढणी लांबली व रब्बी हंगामास विलंब झाला. त्यामागे जमिनीतील ओलावा हे सुद्धा एक कारण आहे. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे खरिपात नुकसान झाले असताना धरणांसह भूगर्भात वाढलेला जलसाठा रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारा असल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे.

Chana Sowing
Chana Sowing : हरभऱ्याची ३ लाख हेक्टरवर पेरणी

रब्बी हंगामात जिल्ह्यात साधारणतः १ लाख ४८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्या जाते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील हरभऱ्याखालील पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. या वर्षी १ लाख ३६ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली असून, गव्हाची पेरणी मात्र ३७ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रात आहे.

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी ४१६९३ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र गव्हाच्या पेरणी क्षेत्रात होत असलेली घट चिंताजनक आहे. रब्बी ज्वारी १३५ हेक्टरमध्ये असून, त्याची पेरणी मेळघाटातील धारणी ५३ व चिखलदरा तालुक्यात ५० हेक्टरमध्ये आहे. वरूड १० व धामणगावरेल्वे तालुक्यात २० हेक्टरवर ज्वारीची पेरणी आहे. धारणी व वरूड तालुक्यात मका पेरणी अनुक्रमे ती १०४९ व ३३७ हेक्टरमध्ये आहे.

१७५९ हेक्टर क्षेत्रात कांद्याची पेरणी

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ (गावरान) कांद्याची तीन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी होत होती. ते क्षेत्रही कमी होऊ लागले आहे. कांदा चाळीसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ न झाल्याने व साठवणुकीसाठी जागा अपुरी पडू लागल्याने पेरणीक्षेत्र घटू लागले आहे.

या वर्षी १७५९ हेक्टर क्षेत्रात कांद्याची पेरणी आहे. अंजनगावसुर्जी तालुक्यात ९५२, अचलपूर २३६, चांदूर बाजार २६०, दर्यापूर ९३, भातकुली ८१, अमरावती ५७, चांदूर रेल्वे ३८, मोर्शी ३६ हेक्टरमध्ये कांद्याची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com