Soybean Market : अमरावती बाजारात सोयाबीनची आवक मंदावली

सोयाबीनचा बाजार अजूनही तेजीत आला नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडू लागली आहे. तर शासकीय केंद्रांवर नोंदणीच नसल्याने शासकीय खरेदीची शक्यता संपुष्टात आली आहे.
Soybean Market
Soybean Marketagrowon

अमरावती : सोयाबीनचा बाजार (Soybean Market) अजूनही तेजीत आला नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडू लागली आहे. तर शासकीय केंद्रांवर नोंदणीच नसल्याने शासकीय खरेदीची शक्यता संपुष्टात आली आहे. सोयाबीनला खुल्या बाजारात हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचा बाजार थंडच आहे.

Soybean Market
बाजारात तुरीची आवक मंदावली!

खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे ८० महसूल मंडळांतील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या उत्पादनाची सरासरी घसरली असतानाच प्रतवारीही घसरली असल्याचे दावे करण्यात येत आहेत. स्टॉक लिमिट उठवण्यात आल्याने स्टॉकिस्ट व बियाण्यांसाठी उच्च प्रतीच्या सोयाबीनसाठी कंपनी बाजारात उतरल्याने सोयाबीनचे दर वधारतील, असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. तो फारसा फलदायी ठरला नाही. शासनाने सोयाबीनला ४३०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. खुल्या बाजारात या दरापेक्षा अधिक दर मिळू लागल्याने शासकीय केंद्र सुरू करण्यात आले असले, तरी नोंदणी मात्र शेतकऱ्यांनी केलेली नाही.

Soybean Market
नागपुरात तेजीच्या अपेक्षेने सोयाबीनची आवक मंदावली

सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला ४९५० ते ५२५० रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. आवक मात्र फारच मर्यादित असून, १० हजारांपेक्षाही कमी पोत्यांची आवक आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २६) बाजार उघडला तेव्हा केवळ ९,७५२ पोत्यांची आवक नोंदविण्यात आली.

गतवर्षी सोयाबीनचे दर १० हजारांवर गेले होते. यंदा ती स्थिती नाही. मात्र शेतकऱ्यांना भाव वाढतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी गरजेपुरते सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. जागतिक पातळीवर भाव अजूनही दबावात असल्याने देशी बाजारात उठाव येत नसल्याने भाव वाढण्याची शक्यता नाही. - राजेश पाटील, खरेदीदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com