Soybean Rate : नांदेडला सोयाबीन सरासरी ४८५० रुपये क्विंटल

दिवाळीनंतर बाजारात आवक वाढली
Soybean Rate
Soybean RateAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची आवक (Soybean) सध्या स्थानिक बाजारात (Market) वाढली आहे. या सोयाबीनला सध्या बाजारात सरासरी चार हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, अशी माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nanded Agricultural Produce Market Committee) सूत्रांनी दिली.

Soybean Rate
Soybean Stock Limit : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले

जिल्ह्यात सर्वाधिक चार ते साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या या पिकाला अतिवृष्टीचा फटका असल्याने यंदा उत्पादकतेत मोठी घट येत आहे. एकरी सरासरी तीन ते पाच क्विंटलपर्यंत सोयाबीनचा उतारा येत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी केली. दिवाळीनंतर हे सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहे. जिल्ह्यातील नांदेड, कुष्णूर, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद, कंधार, लोहा, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर या प्रमुख बाजारापेठांसह खेडा खरेदीही जोरात सुरू आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?

या सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल पाच हजार २०० किमान चार हजार दोनशे तर सरासरी ४८५० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनच्या धान्यात ओलावा असल्यामुळे धान्याला ओलाव्यानुसार सर्वसाधारण भाव मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com