सोयाबीनच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ

तिळाचा हमीभाव सर्वाधिक ५२३ रुपयांनी वाढला
सोयाबीनच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ
Soybean MSP Agrowon

पुणेःकेंद्र सरकारने तीळाच्या हमीभावात (Sesame MSP) सर्वाधिक वाढ केली. सोयाबीनला (Soybean MSP) ३५० रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यासाठी (Cotton MSP ) ३५५ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी ३५४ रुपये वाढविण्यात आले. केंद्राने यंदा सोयाबीनसह इतरही तेलबिया पिकांच्या (Oilseed Crop MSP) हमीभावात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ केल्याचे दिसते.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकित बुधवारी (ता.८) खरिप हंगाम २०२२-२३ साठी १४ पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. या १४ पिकांमध्ये तिळासाठी सर्वाधिक ५२३ रुपये वाढ करण्यात आली. २०२१-२२ च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये वाढ केली होती. मात्र यंदा ३५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळं सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपयांनी ४३०० रुपये झाला. तर मध्यम धागा कापसाच्या हमीभावात ३५४ रुपयांची वाढ करून ६०८० रुपये करण्यात आला. तर लांब धागा कापसासाठी ३५५ रुपयांची वाढ देऊन ६३८० रुपये हमीभाव जाहिर केला.

मुगाच्या हमीभावात ४८० रुपये वाढ केली. मुगाचा हमीभाव आता ७२७५ रुपयांवरून ७७५५ रुपयांवर पोचला. तर तुरीच्या हमीभावात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३०० रुपयांची वाढ करण्यात आली. हंगामात तुरीला आता ६६०० रुपये हमीभाव जाहिर झाला. या पिकांमध्ये मक्याला सर्वांत कमी ९२ रुपये वाढ मिळाली. मक्याचा हमीभाव १८७० रुपयांवरून १९६२ रुपये करण्यात आला.

भूईमुगालाही ३०० रुपयांची वाढ मिळाली. खरिपात आता भुईमुगाला ५८५० रुपये हमीभाव मिळेल. मागील हंगामात २७५ रुपये वाढ मिळाली होती. तर सूर्यफुलाचा हमीभावही ३८५ रुपयांनी वाढविण्यात आला. आता सूर्यफुलाला ६४०० रुपयांचा हमीभाव जाहिर झाला. मागील हंगामात सूर्यफुलाला केवळ १३० रुपयांची वाढ मिळाली होती.

तेलबियांसाठी चांगली वाढ

केंद्र सरकारने खरिप हंगाम २०२२-२३ मध्ये तेलबिया पिकांच्या हमीभावात चांगली वाढली. तीळाच्या हमीभावात सर्वाधिक ५२३ रुपये वाढ झाली. तर सोयाबीन ३५० रुपये, सूर्यफुल ३८५ रुपये आणि भुईमुगाला ३०० रुपये वाढ मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com