सोयाबीन बियाणे दरवाढ शेतकऱ्याला लुटणारी

महाबीजच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र यंदा सोयाबीनच्या त्याच बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागेल. महाबीज प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

पुणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने घेतलेल्या सोयाबीन बियाण्याच्या दरवाढीच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाबीजने सोयाबीनच्या दरात ४० टक्के वाढ केली आहे. या भाववाढीचा आधार घेत खासगी कंपन्यांनी ८० टक्के दरवाढ केली आहे. म्हणजेच ३० किलो बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना सुमारे १७०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ शेतकऱ्यांची लूट करणारी आहे. त्यामुळे ती तातडीने मागे घ्यावी,’’ अशी मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी केली.

गतवर्षी महाबीजच्या सोयाबीनची गोणी २२५० रुपयांना होती. मात्र आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३९०० रुपये मोजावे लागतील. महाबीजच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र यंदा सोयाबीनच्या त्याच बियाण्यांसाठी (Soybean Seeds) शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागेल. महाबीज प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत.

मागील हंगामात सोयाबीनला ७००० रुपये क्विंटल भाव मिळाला. परंतु तोपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांचा माल विकून झाला होता. खरा फायदा साठेबाजी करणारे व मोठ्या व्यापाऱ्यांना झाला. आता महाबीजच्या बियाण्याचा दर १३० ते १४५ रुपये किलो झाला आहे.

दरवाढीमुळे बाजारात बोगस बियाणे येऊन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळालेला भाव बघता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी.

रंगा राचुरे, अध्यक्ष, आम आदमी पक्ष, महाराष्ट्र राज्य

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com