Swacha Bharat : शौचालय दुरुस्तीसाठी विशेष अभियान

स्वच्छ भारत मिशनच्या (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यांतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर या काळात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
Swachh Bharat Abhiyan
Swachh Bharat AbhiyanAgrowon

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ः स्वच्छ भारत मिशनच्या (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यांतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर या काळात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व सुशोभीकरण, वैयक्तिक शौचालय बांधकाम, अनुदान वितरण, बांधलेल्या शौचालयांचा शाश्वत वापर व होण्याच्या दृष्टीने कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुधारित शासन निर्णयानुसार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीबाबत काम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

दर वर्षी १९ नोव्हेंबर हा ‘जागतिक शौचालय दिवस’ (World Toilet Day) म्हणून साजरा होतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Abhiyan) ग्रामीण स्वच्छता (Rural Hygiene) शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम, घनकचरा (Solid West) व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी स्वरूपाचे काम करण्यात येत आहेत.

ही कामे पूर्ण करून गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बदल करून ७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Swachh Bharat Abhiyan
Agriculture Sanjeevani Project : वर्ल्ड बँक प्रतिनिधींचा शेतकऱ्यांशी संवाद

संत गाडगेबाबा अभियान व स्वच्छ भारत अभियान यांच्या कामांची सांगड घालून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विशेष अभियान राबवण्याबाबत गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

Swachh Bharat Abhiyan
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

सप्ताहांतर्गत होणारी कामे

जागतिक शौचालय दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्याबाबत मोहीम स्वरूपात काम करण्यात येणार आहे.

व्यापक जनजागृती करणार

शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने या अभियानात व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे. सांडपाणी व घनकचऱ्याची सुरू असलेली कामे पूर्ण करून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी काम करणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com