Sweet Orange : टपालच्या विशेष लिफाफ्याने मोसंबीच्या 'ब्रॅंडिंग'ला मदत

जालना मोसंबी’च्या अधिकृत वापरकर्त्यांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनी अंतरवाला आणि जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Sweet Orange
Sweet Orange Agrowon

जालना : ‘‘मोसंबीचे ब्रॅंडिंग (Sweet Orange Branding) होण्यास व भाव वधारण्यास टपाल विभागाच्या (Postal Department) विशेष लिफाफ्याद्वारे मदत होईल. सर्व मोसंबी उत्पादक (Sweet Orange Producer) शेतकऱ्यांनी बागायतदार संघ, कृषी विभाग यांच्या सहकार्याने अधिकृत वापरकर्ता व्हावे,’’ असे मत माजी आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

Sweet Orange
Sweet Orange Fruit Fall : मोसंबी फळगळीचे पंचनामे करावेत

‘जालना मोसंबी’च्या अधिकृत वापरकर्त्यांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनी अंतरवाला आणि जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी भारतीय टपाल विभागाच्या विशेष लिफाफ्याचे प्रकाशन करण्यात आले. आमदार कैलाश गोरंट्याल, नाबार्डचे महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रदीप पराते, पोस्ट मास्टर जनरल अदनान अहमद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, ‘आयसीटी’चे संचालक यू. एस. अन्नपूरे, आत्माचे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण आदी उपस्थित होते.

अधिकाधिक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना भौगोलिक मानांकित 'जालना मोसंबी'चे अधिकृत वापरकर्ता आणि जनजागृती करण्यासाठी ही कार्यशाळा झाली. याप्रसंगी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. श्री. अहमद म्हणाले, ‘‘राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेत जालना मोसंबीला एक वेगळे स्थान आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी भारतीय टपाल विभागाद्वारे विशेष लिफ्फ्याचे प्रकाशन करून ते विविध पोस्ट कार्यालयांत विक्रीसाठी ठेवण्यात येतील.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com