Land Record : सात-बारा दुरुस्तीसाठी मुळशीत विशेष सप्ताह

मुळशी तालुक्यातील ऑनलाइन सात-बारामधील नावामध्ये क्षेत्रात, इतर हक्कातील नोंदी, भोगवटादार वर्ग प्रकारांमध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत.
पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा  Seven-twelve to 24,000 farmers in Pune
पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा  Seven-twelve to 24,000 farmers in Pune

पौड : मुळशी तालुक्यातील ऑनलाइन सात-बारामधील (Sat-Bara) नावामध्ये क्षेत्रात, इतर हक्कातील नोंदी, भोगवटादार वर्ग प्रकारांमध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत. या किरकोळ अशा टायपिंग स्वरूपातील चुका मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी गुरुवारपासून (ता. १) ते मंगळवारपर्यंत (ता. ७) मुळशीतील पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृह येथे विशेष सप्ताहाचे आयोजन केले असून नागरिकांनी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यात २४ हजार शेतकऱ्यांना सात-बारा  Seven-twelve to 24,000 farmers in Pune
Crop Insurance : पीकविमा दिला नाही तर कारवाई ः कृषिमंत्री सत्तार

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मुळशीतील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने सात-बारा चूकदुरुस्तीकरिता महाराजस्व अभियान राबवावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार अभय चव्हाण यांनी गावकामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांना सातबारा चूक दुरुस्तीकरिता विशेष सप्ताह आयोजित केला आहे.

मुळशीमधील शेतकऱ्यांनी या विशेष सप्ताहचा लाभ घेऊन आपले सात-बाऱ्यावर झालेल्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात आणि कामाचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी पाऊले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडलनिहाय आयोजन केले असून १ डिसेंबर रोजी घोटावडे मंडल येथून सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. २) पिरंगुट मंडल, ५ डिसेंबर रोजी थेरगाव मंडल, ६ व ७ डिसेंबर रोजी पौड, माले, मुठा मंडलमध्ये येणाऱ्या तलाठी कार्यालयमधील गावांची चूक दुरुस्तीकरिता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com