Rabi Sowing : देशातील रब्बी लागवडीला वेग

देशात रब्बी हंगामातील पेरणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेरा जास्त झाला आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

पुणे ः देशात रब्बी हंगामातील (Rabi Season) पेरणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेरा जास्त झाला आहे. मोहरी आणि हरभऱ्याच्या लागवडीने (Mustard And Chana Sowing)जोर धरला आहे. तर गव्हाची पेरणी अद्यापही सुरु झालेली नाही.

देशातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाने देशातील अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र रब्बी पेरणीसाठी पाण्याची उपलब्धता झाली. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच देशातील काही भागांमध्ये रब्बी पिकांची पेरणी सुरु झाली. देशात आत्तापर्यंत २५ लाख १५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली. मागीलवर्षी याच काळातील पेरा १७ लाख २२ हजार हेक्टरवर झाला होता. म्हणजेच यंदा ४६ टक्क्यांनी लागवडीखालील क्षेत्र वाढले.

Rabi Sowing
Sweet Corn : स्वीटकॉर्न सह प्रक्रियायुक्त मालाची सहा देशांना निर्यात

देशातील एकूण लागवडीपैकी राजस्थानमध्ये जवळपास १२ लाख हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला. मागील हंगामात केवळ साडेसात लाख हेक्टर मोहरीखाली होते. तर ४ लाख हेक्टर क्षेत्र हे उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशात २ लाख ८० हजार हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला आहे. मागील हंगामात याच काळातील लागवड मात्र सव्वातीन लाख हेक्टरवर होती.

मोहरीची सर्वाधिक लागवड

आत्तापर्यंत झालेल्या एकूण लागवडीत मोहरीचे क्षेत्र सर्वाधिक १५ लाख हेक्टरवर आहे. यंदा मोहरीची लागवड ४० टक्क्यांनी आघाडीवर आहे. मागील हंगामात जवळपास ११ लाख हेक्टरवर मोहरीची पेरणी झाली होती. तर हरभऱ्याची लागवड जवळपास ४ लाख हेक्टरवर झाली. तर मागील हंगामात याच कालावधीत २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली होते. मात्र गव्हाची पेरणी अद्याप सुरु झालेली नाही.

मोहरीला ५ हजार ४५० रुपये हमीभाव

केंद्र सरकारने यंदा मोहरीसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र राजस्थानमध्ये चालू महिन्यात सरासरी ५ हजार ७८५ रुपये दर मिळाला. तर उत्तर प्रदेशातील दर ६ हजार १७४ रुपयांवर होता. म्हणजेच मोहरी दबावात असतानाही हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com