Domihira Project : जव्हारच्या डोमिहीरा प्रकल्पाला गळती

ठाणे व पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डोमिहीरा नदी प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात आले आहे.
Domihira Project
Domihira ProjectAgrowon

ठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर (Water Shortage) मात करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डोमिहीरा नदी प्रकल्पांतर्गत (Domihira Project) धरण बांधण्यात आले आहे. पण या धरणातील पक्षी भिंतीतून पाण्याची गळती (Water Linkage) होत असल्याचे समोर आले आहे. याची वेळीच डागडुजी न केल्यास हे धरण फुटून दुर्घटना होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Domihira Project
Irrigation : वाया जाणारे पाणी डावा कालव्यातून तलावात सोडा

जव्हार तालुक्यात डोमिहीरा नदी प्रकल्पावर खडखड धरण जलसंपदा विभागाकडून १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. या धरणाचा उजवा कालवा १७ किलोमीटर लांबीचा असून, जव्हारमधील खडखड, मोरगिर, वांगणपाडा, पिंपळगाव, धरामपूर, न्याहळे यासह मोखाड्यातील रायतळे गावातील ६८५ हेक्टर जमीन सिंचनाखाली प्रस्तावित आहे.

Domihira Project
Sustainable Irrigation : बंदिस्त पाणीपुरवठ्यामुळे शाश्‍वत सिंचन

या धरणाची क्षमता १४.४९ दलघमी असून, उपयुक्त पाणी १३.८५ दलघमी इतके आहे, पण या धरणाला गळतीचे ग्रहण लागले आहे. या धरणाचे मातीकाम फेब्रुवारी २००२ पासून सुरू करण्यात आले असून घळभरणीचे काम मे २००९ मध्ये पूर्ण झाले. तसेच सांडव्याचे मूळ काम मे २०१० मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर धरणामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. अशातच २०१२ मध्ये सांडव्यातून व पक्षीभिंतीतून पाणी गळती होत असल्याचे आढळले. त्यानुसार अनुषंगाने जलसंपदा विभागाने चौकशी समिती गठीत केली. या समितीने दिलेल्या अहवालात सांडव्याचे काम सदोष असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार संबंधित कंत्राटदारावर कारवाई करत १२.७० लक्ष रुपये दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान

दामणगंगा खोऱ्यात वाहणाऱ्या डोमिहीरा नदीवर बांधलेल्या या धरण परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गुजरात, महाराष्ट्रातून पर्यटक फिरण्यासाठी येतात. सर्वांच्या आकर्षणाचे पर्यटन स्थळ झालेल्या धरणाच्या विभाजक भिंतीतून कायम पाणी झिरपत आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर धरणाच्या भिंतीतून ठिकठिकाणी पाण्याचे झरे निर्माण होतात. तसेच वर्षाचे बाराही महिने भिंतीतून पाणी झिरपत आहे.

१०० शेतकऱ्यांची जमीन संपादित

धरणाच्या निर्मितीसाठी खडखड, खरवंद, बोरहट्टी या आदिवासी गावातील सुमारे १०० शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात एकरी केवळ अकरा हजार देण्यात आले. कवडीमोल भावाने आमच्या जमिनी सरकारने घेतल्या. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. या धरणाचा फारसा उपयोग होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी देखील उन्हाळ्यात वणवण होते. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या विभाजक भिंतीतून पाणी गळती होते. तसेच धरणातील पाण्यापासून वीज निर्मिती प्रकल्प ही सुरू झाला नसल्याची माहिती स्थानिक शेतकरी सदाशिव राऊत यांनी दिली.

लवकरच डागडुजी

धरणाची दुरुस्ती करून, भिंतीमधून होणारी पाणी गळती

पूर्णपणे थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. तज्ज्ञ समितीने शिफारस केलेल्या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सांडव्याचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर पक्षीभिंतीची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती पालघर जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com