बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

श्रीकृष्ण जन्माष्टमीला जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात होणाऱ्या मंगला आरतीवेळी झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले.
Banke Bihari Temple
Banke Bihari TempleAgrowon

वृंदावन ः श्रीकृष्ण जन्माष्टमीला (Krishn Janmashtmi) जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात (Banke Bihari Temple) होणाऱ्या मंगला आरतीवेळी झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी (Stampede In Banke Bihari Temple) होऊन झालेल्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उत्तर रात्री १.५५ वाजता ही घटना घडली. वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीसाठी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. त्या वेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.

Banke Bihari Temple
Cotton Conference : जळगावात १८ सप्टेंबर रोजी कापूस व्यापार परिषद

वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होतात. मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले, की मथुरेच्या वृंदावन बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि एकच गोंधळ उडाला. यामध्ये महिलेसह एका पुरुष भाविकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींना रामकृष्ण मिशन, ब्रज हेल्थ केअर आणि वृंदावन येथील शैया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री आदित्यनाथांकडून अधिकाऱ्यांना सूचना

मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील गर्दी लक्षात घेता सणांच्या दिवशी मंदिरांसह ठिकठाकाणी अधिक कडक व्यवस्था करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील, असे निर्देशही मुख्यमंत्री योगी यांनी गृह विभागाला दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com