Economics : घरापासून अर्थशास्त्राची सुरुवात करा

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना राष्ट्रासह अंतराष्ट्रीयस्तरापर्यंत शास्त्रज्ञ, प्राध्यापकांकडून अभ्यास केला जातो.
Economics
Economics Agrowon

जालना : अर्थशास्त्राचा (Econimics)अभ्यास करताना राष्ट्रासह अंतराष्ट्रीयस्तरापर्यंत शास्त्रज्ञ, प्राध्यापकांकडून अभ्यास केला जातो. मात्र घरापासून अर्थशास्त्राची सुरुवात करा. घराचे बजेट हे उत्तम झाले तर देशाचे अर्थव्यवस्था (Economy) चांगली होईल. देशाची अर्थव्यवस्था ही अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानी आली असून, देशाची अर्थव्यवस्था उत्तम होत आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दावने (Raosaheb Danve) यांनी म्हटले आहे.

Economics
Shrilanka Economic Crisis : श्रीलंकेची दुर्दशा का झाली ?

जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात आयोजित ४५ व्या महाराष्ट्र राज्य अर्थशास्त्र परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. आर. बी. भांडवलकर, आमदार प्रताप अडसड, जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास बगडिया, प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, डॉ. अविनाश निकम, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. राहुल म्होपरे, डॉ. अनिल सूर्यवंशी, प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने, भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, की अर्थशास्त्र हा माझा विषय नाही. परंतु अर्थशास्त्राची सुरुवात ही घरापासून करा. घराचे बजेट उत्तम झाले पाहिजे. जर घराचे, ग्रामपंचायतीचे, नगरपालिकेचे, जिल्हा परिषदेचे बजेट उत्तम झाले, तरच राज्याची आणि देशांची आर्थिक स्थिती अधिक सुधारते, असेही श्री. दानवे यांनी या वेळी म्हटले.

 देशात बेरोजगारी मोठा प्रश्‍न

बेरोजगारी ही देशासह जगाची समस्या झाली आहे. कोटीच्या संख्येने तरुण हे नोकरीच्या शोधात आहेत. परंतु बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यास देशाची अर्थ व्यवस्था अद्यापि सक्षम झाली नाही, असे चित्र आहे.

त्यात देशात गरीब आणि भांडवलदार यांच्यात मोठी आर्थिक विषमतेची दरी निर्माण झाली आहे. त्यात कोरोनानंतर वीस लाख नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे देशाचे आर्थिक नियोजन करताना रोजगार निर्मितीचा स्वतंत्र विचार झाला पाहिजे. दरवर्षी तीस लाखांपेक्षा अधिक तरुण पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे शिक्षण आणि रोजगाराची याची सांगड घातल्याशिवाय हा प्रश्‍न मार्गी लावणार नाही.

-डॉ. आर. बी. भांडवलकर, अध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com