‘प्रशासन आपल्या गावी’ उपक्रमाची सुरवात

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एका छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ या मंडळस्तरीय उपक्रमाची सुरवात केली आहे.
Government scheme
Government schemeAgrowon

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एका छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (Dr. Vipin Itkar) यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ (Prashasan Aaplya gaavi) या मंडळस्तरीय उपक्रमाची सुरवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी या उपक्रमाला सुरवात करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने सुटावीत, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शासनाच्या विविध कार्यालयाचा एकमेकांशी व नागरिकांशी परस्पर समन्वय राहावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरीय विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. या योजनेचे नियंत्रण संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी करणार आहेत. एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये दर शुक्रवारला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांनी शुक्रवारी एका मंडळात हे आयोजन करायचे आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी नियोजन करण्यासाठी सर्व तालुकास्तरीयंत्रांची बैठक घेऊन कार्यक्रमाची आखणी तहसीलदार करणार आहे.

हा कार्यक्रम मंडळ मुख्यालयात जिल्हा परिषद शाळा अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहतील. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका उपअधीक्षक, भूमि अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत गटशिक्षण अधिकारी, नायब तहसीलदार महसूल, नायब तहसीलदार पुरवठा आदींसह ग्राम पातळीवर कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीही गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपवनसंरक्षक अशा जिल्हास्तरीय 20 विभाग प्रमुखांची या समितीमध्ये वर्णी लावण्यात आली असून प्रत्येकाला जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाने कोणते काम करावे या संदर्भातील निर्देश देण्यात आले. प्रत्येक ठिकाणाच्या उपक्रमानंतर अनुपालन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये दर शुक्रवारला सर्व मंडळात एकाचवेळी कार्यक्रम तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचा समन्वय जिल्हा परिषद शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करणार कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणार उपविभागीय अधिकारी संनियंत्रण ठेवणारजिल्हास्तरीय संनियंत्रण समिती पुढे अनुपालन अहवाल सादर होणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com