Vegetable Market : ‘लासलगावला लगेज तिकिटावर भाजीपाला बुकिंग सुरू करा’

शेतकऱ्यांच्या हितासाठी भुसावळ डिव्हिजन व वाणिज्य विभागाने या बाबीचा तत्काळ विचार करून मनमाड विशेष सीएसटी गाडीने लगेज तिकिटावर भाजीपाला बुकिंग सुरू करावे, अशी मागणी भाजीपाला व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे.
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

लासलगाव, ता. निफाड : छोटे शेतकरी व व्यापारी तीस ते पस्तीस वर्षांपासून गोदावरी, नागपूर या रेल्वे गाड्यांनी (Rail Transport) शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा भाजीपाला मुंबईला लोडिंग (Vegetable Loading) करतात; मात्र आता लासलगाव स्टेशनला पार्सल सुविधा ()Parcel Facility उपलब्ध नसल्यामुळे सामान्य शेतकरी व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना शेतीमालाला भाव नसल्यामुळे कल्याण, ठाणे, दादर, मुंबई, कुर्ला येथे शेतीमाल स्वतः विकून शेतकऱ्यांना तसेच रेल्वे प्रशासनाला दोन पैसे मिळतात.

Vegetable Market Rate
Vegetable Cultivation : प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घ्यावा

शेतकऱ्यांच्या हितासाठी भुसावळ डिव्हिजन व वाणिज्य विभागाने या बाबीचा तत्काळ विचार करून मनमाड विशेष सीएसटी गाडीने लगेज तिकिटावर भाजीपाला बुकिंग सुरू करावे, अशी मागणी भाजीपाला व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे. मनमाड सुपरफास्ट गाडी क्र.०२१०२ विशेष सीएसटी (गोदावरी) या रेल्वेने लासलगाव रेल्वे स्थानकावर लगेज तिकिटावर भाजीपालाच बुकिंग सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच भाजीपाला व्यापाऱ्यांनी केली आहे.

Vegetable Market Rate
Vegetable Market : भाजीपाल्याची थेट विक्री ठरतेय फायदेशीर

याबाबत लेखी निवेदन येथील भाजीपाला व्यापारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंडल रेल्वे प्रबंधक वाणिज्य विभाग, वरिष्ठ डीसीएम भुसावळ, स्टेशन मॅनेजर, मध्य रेल्वे, लासलगाव आरपीएफ, पार्सल पर्यवेक्षक यांना पाठविले आहे. निवेदनावर शेतकरी मधुकर गावडे, अनिल शेजवळ, रामनाथ शेजवळ, सतीश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मध्य रेल्वेने सकाळी गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेवर मनमाड सीएसटी विशेष गाडी सुरू केली आहे; मात्र रेल्वे प्रशासनाकडून या मनमाड सुपरफास्ट विशेष सीएसटी गाडीने लासलगाव रेल्वे स्थानकावर लगेजच्या तिकिटावर भाजीपाला बुकिंग करू न दिल्याने शेतकरी व्यापारी वर्गात नाराजीचा सूर आहे.

रेल्वेच्या मागील पार्सल व्हॅनमध्ये भाजीपाला भरण्याची वारंवार परवानगी मागितली, त्याबाबत पत्रव्यवहारदेखील केला आहे. लासलगाव पार्सल पर्यवेक्षक व स्टेशन व्यवस्थापक यांना शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी समक्ष भेटून रेल्वे स्थानकावर लगेज तिकिटावर भाजीपाला बुकिंग सुरू करण्यासंदर्भात माहिती दिली; लासलगाव रेल्वे स्थानकावर या विशेष रेल्वेला तीन मिनिटांचा अतिरिक्त थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली. लवकरात लवकर भाजीपाल्यासाठी येथील रेल्वे स्थानकात बुकिंग सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com