लहान शहरांमधूनही स्टार्टअप उद्योजक

‘मन की बात’चा हा ८९ वा भाग होता. यामध्ये पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या युनिकॉर्न, स्टार्टअप आणि लहान व्यवसायांबद्दल भाष्य केले. तसेच स्टार्टअपमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.
Narendra modi
Narendra modiAgrowon

नवी दिल्ली : देशातील युनिकॉर्नची संख्या १०० च्या पुढे गेली असून, जागतिक महामारीच्या काळातही भारतीय स्टार्टअप संपत्ती निर्मितीमध्ये सक्षम आहेत. भारताची स्टार्टअप इकोसिस्टम फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नसून लहान शहरांमधूनही उद्योजक पुढे येत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील स्टार्टअपच्या कामगिरीची प्रशंसा ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून केली.

‘मन की बात’चा हा ८९ वा भाग होता. यामध्ये पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या युनिकॉर्न, स्टार्टअप आणि लहान व्यवसायांबद्दल भाष्य केले. तसेच स्टार्टअपमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. ते म्हणाले, की आज देशातील स्थानिक उत्पादने जगभरात प्रसिद्ध होत आहेत. युनिकॉर्नच्या शतकी कामगिरीकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले, की क्रिकेटमधील वाढत्या धावांप्रमाणेच युनिकॉर्नची संख्या जाणूनही सर्व भारतीयांना आनंद व्हायला हवा. काही दिवसांपूर्वी देशाने अशी कामगिरी केली आहे जी आपल्या सर्वांना प्रेरणा देते, भारताच्या क्षमतेबद्दल आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करते. या महिन्यात पाच तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या १०० वर पोहोचली आहे.

मोदी म्हणाले, की एकूण युनिकॉर्नपैकी ४४ कंपन्या मागील वर्षी सुरू झाल्या. तर या वर्षाच्या तीन ते चार महिन्यांमध्ये आणखी १४ नवीन युनिकॉर्न सुरू झाले. याचाच अर्थ जागतिक महामारीच्या काळातही आपले स्टार्टअप संपत्ती आणि विश्‍वास निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. आज भारताची स्टार्टअप इकोसिस्टम फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही. लहान आणि मध्यम शहरांमधूनही उद्योजक उदयास येत आहेत. यावरून हे दिसून येते की भारतात ज्याच्याकडे चांगली कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, असेही मोदी म्हणाले.

या वेळी पंतप्रधान मोदींनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्यांची तसेच प्रेरणादायक यशोगाथांचीही माहिती दिली. या वेळी तंजावूरमधील बाहुली बनविणाऱ्या महिला बचत गटाचे उदाहरण दिले. तंजावर बाहुली निर्मिती उपक्रमाशी २२ बचत गट जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तर महिलांना कचरा व्यवस्थापन शिकविणाऱ्या देववर येथील चंपा देवी, स्वच्छता कार्यक्रम राबविणारे गुप्तकाशी सुरेंद्र बागवाडी, मूळची उत्तराखंड येथील जोशीमठची रहिवासी असलेली कल्पना हिने क्षयरोग आणि दृष्टिदोष यांसारख्या व्याधींवर मात करून म्हैसूरमध्ये तीन महिन्यांत कन्नड भाषा आत्मसात केली, यांचाही उल्लेख मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com