Startup Festival : नव-उद्योजकांसाठी सोमवारपासून स्टार्टअप यात्रा

‘‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन मंडळ आणि उद्यम इनक्युबेशन सेंटरतर्फे जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नव-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी पूरक वातावरणनिर्मितीकरिता १४ ते २९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
Startup
Startup Agrowon

सोलापूर ः ‘‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन मंडळ आणि उद्यम इनक्युबेशन सेंटरतर्फे जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नव-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअप (Startup) परिसंस्थेच्या विकासासाठी पूरक वातावरणनिर्मितीकरिता १४ ते २९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान स्टार्टअप यात्रेचे (Startup Festival) आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

Startup
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

नावीन्यता कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत.

याकरिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसमूह एकत्रित होण्याच्या ठिकाणी स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनासाठी एक फिरते वाहन येणार आहे.

Startup
Rabbi Season : रब्बीच्या क्षेत्रात पन्नास टक्के वाढ अपेक्षित

...येथे करा संपर्क

‘‘यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण कल्पना या वेळी विद्यार्थी व नागरिक नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी व आपला सहभाग नोंदविण्यासाठी ७०८०२०२०५५, ७०८०२०२०५६ या क्रमांकांशी संपर्क साधावा’’, असे आवाहन इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com