राज्य सरकार सहा महिन्यांत पडेल ः रघुनाथदादा पाटील

सध्या सरकारमध्ये बदल झालेले असून, सरकारचे काहीही खरे नाही. जसे चोरांच्या चोऱ्या करण्यासाठी जुळवाजुळव सुरू असते. तसे राज्यकर्त्यांची सत्ता मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे.
Raghunathdada Patil
Raghunathdada PatilAgrowon

तळेगाव ढमढेरे, जि. पुणे : सध्या सरकारमध्ये बदल झालेले असून, सरकारचे काहीही खरे नाही. जसे चोरांच्या चोऱ्या करण्यासाठी जुळवाजुळव सुरू असते. तसे राज्यकर्त्यांची सत्ता मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. हे सरकार चालवण्याच्या लायकीचे नसून आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला असून, हे सरकार पाच-सहा महिन्यांत पडेल, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil) यांनी व्यक्त.

Raghunathdada Patil
Ethanol Production:दोन इथेनॉल प्रकल्पांच्या अंतराची अट रद्द करावी : रघुनाथ पाटील

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऊस परिषदेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. पाटील हे शनिवारी (ता. ३) बोलत होते.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी अध्यक्ष रामेश्वर गाडे, हनुमंत वीर, पुणे जिल्हाध्यक्ष बाबा हरगुडे, वस्ताद दौंडकर यांसह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले. तर बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com