Honey Village : ‘मधाचे गाव-मांघर’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

Honey Production : महाबळेश्‍वर येथील मधाचे गांव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

Satara News महाबळेश्‍वर येथील मधाचे गांव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली आहे.

देशातील पहिले मधाचे गाव-मांघर ही संकल्पना राबवून हे गाव मध उद्योगातून स्वयंपूर्ण करण्याच्या उपक्रमाची संकल्पना सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळास त्यासाठीचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Eknath Shinde
Honey Bee Keeping : मधमाशीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे आयोजित शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिन कार्यक्रम-२०२३’ अंतर्गत प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पारितोषिक २०२२-२३ राज्यस्तर ‘वर्ग-अ’ वर्गवारित मधाचे गाव स्वयंपूर्ण करण्यासाठीचा पुरस्कार मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी स्वीकारला.

मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com