Hirda : जुन्नर येथे रविवारी होणार राज्यस्तरीय हिरडा परिषद

बाळहिरड्याचे भाव सध्या अत्यंत कमी झाले आहेत. यातून प्रचंड मोठे आदिवासी व बिगर आदिवासींचे शोषण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर किसान सभेने व्यापक जनआंदोलन सुरू केले आहे.
Hirda Parishad
Hirda ParishadAgrowon

पुणे : बाळहिरड्याचे (Balhirda Rate) भाव सध्या अत्यंत कमी झाले आहेत. यातून प्रचंड मोठे आदिवासी व बिगर आदिवासींचे शोषण (Tribal Exploitation) सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर किसान सभेने व्यापक जनआंदोलन (Kisan Sabha Protest) सुरू केले आहे. या आंदोलनाची पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी व आदिवासी आणि बिगर आदिवासींच्या उपजीविका सुनिश्‍चित करण्यासाठी रविवारी (ता.१०) जुन्नर येथे राज्यस्तरीय हिरडा परिषद (Hirda Parishad At junnar) होईल.

Hirda Parishad
हिरडा खरेदीविषयीचा प्रस्ताव शासनाला सादर करणार

ही परिषद आदिवासी सांस्कृतिक भवन येथे होईल. किसान सभेच्या राज्य समितीने या परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे. पुणे, नगरसह विविध जिल्ह्यांतील हिरडा उत्पादक शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या परिषदेत हिरड्या विषयी मुख्य तीन ठराव मांडले जातील. या बरोबरच इतर सामाजिक प्रश्‍नांवर ही ठराव या परिषदेत मांडले जातील.

Hirda Parishad
बाळहिरडा खरेदीप्रश्‍नी आंदोलनाची तयारी सुरू

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाला बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ द्यावा. तातडीने बाळहिरडा खरेदी करावा. त्यास रास्त दर द्यावा. आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हितार्थ दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी बाळहिरडा व मोठा हिरडा यांचा अभ्यास करणारी समिती स्थापित करावी. निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळी शासनाने पंचनामे केले होते. परंतु नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी आदी मागण्यांचा ठरावात समावेश असेल.

माकपचे आमदार विनोद निकोले या हिरडा परिषदेचे उद्‍घाटन करतील. आमदार अतुल बेनके, अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य समितीचे सरचिटणीस डॉ. अजित नवले, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी राहुल पाटील, किसान सभेचे राज्य पदाधिकारी कॉ. उमेश देशमुख उपस्थित राहतील. अध्यक्षपदी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com