
Pune News : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात (Kharif Season) पीकस्पर्धा (Crop Competition) राबविण्यात आली होती. या स्पर्धेचे निकाल कृषी विभागाने जाहीर केले आहेत. यामध्ये भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडावी, या हेतूने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात खरीप हंगाम सन २०२२ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पीकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.
शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षिसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२२ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.
मराठवाड्यातील महिला शेतकरी जयश्री भीमराव डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चारपट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शेतकरी बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. नांदेडच्या वनीता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम, तर यवतमाळच्या रेखा रमेश कुमरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
शेतकरी प्रल्हाद नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात, तर संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सातपट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप :
- राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रुपये ५०,०००
- राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रुपये ४०,०००
- राज्यस्तरीय तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रुपये ३०,०००
राज्यस्तरीय पीकस्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेली शेतकऱ्यांची नावे :
भात (सर्वसाधारण गट) : नितीन चंद्रकांत गायकवाड (चांदखेड, पुणे), कृष्णात गोपाळ खाडे (सांगरूळ,कोल्हापूर), बाबूराव अप्पाजी परीट (सुळकूड, कोल्हापूर)
भात (आदिवासी गट) : चांगुनाबाई भिका गवारी (कोल्हेवाडी, पुणे), मुरलीधर सखाराम कवठे (कोपरे, पुणे), शांताराम तुकाराम बोकड (आळे, पुणे)
खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट) : प्रल्हाद नारायण काळभोर (हरपळवाडी, सातारा), ज्ञानेश्वर चिंतामण पाटील (गहूखेडे, जळगाव), अर्जुन दामू पाटील (वडगाव, जळगाव)
खरीप ज्वारी (आदिवासी गट) : रोहिदास विजय पाडवी (धनपूर, नंदूरबार), बिलाड्या चमाऱ्या पावरा (शेमल्या, धुळे), सुकमाबाई खुमसिंग पावरा (पानखेड, धुळे)
बाजरी (सर्वसाधारण गट) : विठ्ठल ईश्वर सावंत (माडग्याळ, सांगली), विठ्ठल बापू चोपडे (माडग्याळ, सांगली), नामदेव चनबसू माळी (माडग्याळ, सांगली)
बाजरी (आदिवासी गट) : लक्ष्मण जगन पावरा (हाडाखेड, धुळे), जगदीश हारू पावरा (हाडाखेड, धुळे), वामन लालसिंग पावरा (हाडाखेड, धुळे)
मका (सर्वसाधारण गट) : संभाजी तातोबा खंडागळे (अग्रण धुळगाव, सांगली), सुमंत तुळशीराम पवार (वाटंबरे, सोलापूर), भीमराव राजाराम खर्चे (लोणविरे, सोलापूर)
मका (आदिवासी गट) : दशरथ राज्य वळवी (भादवड, नंदुरबार), गंगाराम वेस्ता पावरा (चाकडू, धुळे), रणजित गणा पावरा (चाकडू, धुळे)
नाचणी (सर्वसाधारण गट) : शिवलिंग कल्लाप्पा गावडे (हंबिरे, कोल्हापूर), बाळू लक्ष्मण भडगावकर (सातवणे, कोल्हापूर), विष्णू धोंडिबा (गावडे ई-म्हाळूंगे, कोल्हापूर)
नाचणी (आदिवासी गट) : शिडीबाई सोमा बरतड (रोडवहाळ, ठाणे), जानू ओको कामडी (मुसईवाडी, ठाणे), पद्माकर महादू वाख (मुसईवाडी, ठाणे)
तूर (सर्वसाधारण गट) : जयश्री भीमराव डोणगापुरे (रावणगाव, लातूर), विक्रम पंढरीनाथ अकोलकर (करंजी, नगर), बाई बुवासाहेब शिंदे (धोंडपारगाव, नगर)
तूर (आदिवासी गट) : दिलीप चामट्या भील (बामखेडा त. स., नंदुरबार)
मूग (सर्वसाधारण गट) : सुभाष बाजीराव कर्डिले (रांजणगाव मशिद, नगर), गोरख हरीभाऊ जाधव (अकोळनेर, नगर), धोंडीभाऊ मारुती जरे (ससेवाडी, नगर)
मूग (आदिवासी गट) : शांताबाई पंडित चौधरी (मेहदर, नाशिक), प्रकाश हेमकांत बंकाळ (मेहदर, नाशिक)
उडीद (सर्वसाधारण गट) : दीपक तुकाराम ढगे (निमगाव गांगर्डी, नगर), नितीन सूर्यकांत शेटे (धोत्री, नगर), भागचंद्र शाहुराव उगले (नायगाव, नगर)
उडीद (आदिवासी गट) : सखाराम कैस गावित (खोकसा, नंदूरबार)
सोयाबीन (सर्वसाधारण गट) : बाजीराव सखाराम खामकर (बोरपाडळे, कोल्हापूर), राजाराम योगाजी शिंदे (कासारखेडा, नांदेड), रमेश विलास जाधव (येलूर, सांगली)
सोयाबीन (आदिवासी गट) : वनीता श्रीराम फोले (सांगवी, नांदेड), नारायण मल्हारी तुगार (चौसाळे, नाशिक), रेखा रमेश कुमरे (चिंचवळ, यवतमाळ)
भूईमूग (सर्वसाधारण गट) : कृष्णा भाऊ चौगुले (बहिरेवाडी, कोल्हापूर), रामचंद्र विठू कोरे (ऐतवडे खु., सांगली), सावित्रीबाई रामचंद्र पाटील (ऐतवडे खु., सांगली)
सूर्यफूल (सर्वसाधारण गट) : सोपान कृष्णा कारंडे (डिकसळ, सोलापूर), विश्वनाथ भीमराव पाटील (मुंढेवाडी, सोलापूर), भारत लक्ष्मण मुंगसे (बोराळे, सोलापूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.