Kharif Season 2023 : राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी मुंबईत

Kharif Season Update : कृषी विभागाअंतर्गत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे बुधवारी (ता. २४) दुपारी आयोजित करण्यात आली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : कृषी विभागाअंतर्गत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे बुधवारी (ता. २४) दुपारी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मुंबईतील नरिमन पॉईट, जगन्नाथ भोसले मार्ग येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेण्यात येणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष, सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व कृषी सभापती, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव,

नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंपदाचे अपर मुख्य सचिव, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव,

आदिवासी विभागाचे अपर मुख्य सचिव, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त, साखर आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, भारतीय हवामान विभागाचे प्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महामंडळे, कृषी विभागाचे संचालक, वरिष्ठ अधिकारी अशा विविध विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Agriculture Department
Kharif Season 2023 : शेती मशागतीची दरवाढ

पीककर्ज या सहकार विभागाशी संबंधित विषयांसंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीचे अध्यक्ष व बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष यांना देखील उपस्थित राहावे. सभेसाठी राज्यस्तरीय टिप्पणी व सादरीकरणही तयार करावे. सभेची सर्व दृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी.

Agriculture Department
Kharif Season 2023 : खरीप हंगामासाठी कृषी यंत्रणा लागली कामाला

विभागीय स्तरावरील कृषी विभागाचे सादरीकरण सर्व कृषी - विभागीय सहसंचालकांचे सादरीकरण ठेवण्यात आलेले आहे. तसेच विद्यापीठांचे कुलगुरू, सहकार विभागाचे पीककर्ज या संदर्भात स्वतंत्र सादरीकरण ठेवण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने कृषी आयुक्त कार्यालयाने संबंधितांशी कृपया संपर्क साधावा.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठका संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या समवेत १५ मे २०२३ पर्यंत पार पाडण्यात याव्यात. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक बाबीवर स्वत: बारकाईने लक्ष द्यावे. या संदर्भात कृषिमंत्री यांच्या कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन कक्ष अधिकारी अभिजित चव्हाण यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com