‘केंद्रा’कडून राज्याला १९ हजार कोटी मिळणार

निती आयोगाची बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून १९ हजार कोटी रुपयांचे विशेष प्रस्ताव राज्य सरकारतर्फे दिले आहेत. त्यासाठी तातडीने निधी देण्याचे आश्‍वासन केंद्राने दिले आहे, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी (ता. २८) दिली.
Government Fund
Government FundAgrowon

कऱ्हाड, जि. सातारा ः राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ज्या गोष्टीवर प्राधान्याने खर्च करायचा आहे त्यासाठीच आमचे प्राधान्य आहे. निती आयोगाची (Niti Ayog) बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भेटून १९ हजार कोटी रुपयांचे विशेष प्रस्ताव राज्य सरकारतर्फे दिले आहेत. त्यासाठी तातडीने निधी देण्याचे आश्‍वासन केंद्राने दिले आहे, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई (Shamburaj Desai) यांनी रविवारी (ता. २८) दिली.

Government Fund
NITI Aayog Meet: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून हमीभावाच्या कायद्याचा आग्रह

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्री देसाई यांनी कऱ्हाडला (जि. सातारा) पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, की मी राज्याचा अर्थराज्यमंत्री होतो त्या वेळी निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. दिल्लीत निती आयोगाची बैठकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला तातडीने निधी मिळेल. पालकमंत्री यांच्या नेमणुका झाल्या नसल्या, तरी राज्यातील कोणतेही काम अथवा निर्णय थांबलेले नाहीत. लवकरच त्या नेमणुका होतील. राज्यात १ लाख ८२ हजारांपेक्षा पदे राज्य सरकारकडून भरलेली नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यापैकी ७५ हजार सरकारी, निमसरकारी मंजूर असलेली पदे वर्षाच्या आत भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Government Fund
Niti Aayog: वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे फेरचौकशीचे आदेश

सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प, डोंगरी तालुके, पर्यटन, औद्योगिक प्रगतीसह अन्य विकासाबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

मंत्र्यांनी अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले

मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आले. त्यापूर्वी काही मिनिटे अचानक तेथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मंत्री देसाई संतापले. त्यांनी एका अधिकाऱ्याला बोलावून घेऊन आताच लाइट कशी गेली, अशी विचारणा केली. त्या वेळी, ‘साहेब मला माहीत नाही...मी नवीन आहे...’ असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई यांना नम्रपणे सांगितले. मात्र संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com