पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांच्या उजळणीची गरज

पुन्हा एकदा पंचशील आणि २२ प्रतिज्ञांची उजळणी करूया आणि उद्याचा भारत निर्माण करूया, असा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ५) येथे व्यक्त केला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisAgrowon

नागपूर ः पुन्हा एकदा पंचशील (Panchshil) आणि २२ प्रतिज्ञांची उजळणी करूया आणि उद्याचा भारत निर्माण करूया, असा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बुधवारी (ता. ५) येथे व्यक्त केला.

दीक्षाभूमीवर आयोजित ६६ व्या धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कमलताई गवई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस आयुक्त डॉ. अमितेशकुमार, महापालिकेचे आयुक्त राधाक्रिष्ण बी, उपस्थित होते.

Devendra Fadanvis
Cotton Rate : कापूस आवक का घटली?

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात तथागतांचा बुद्ध धम्म देऊन या देशातील जनतेला प्राचीन संस्कृतीशी जोडले. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म हा वैश्‍विक धम्म आहे. त्याचे अनुभव देशविदेशात भेटी दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घेतला असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. फक्त संविधानानेच देशात समता प्रस्थापित झाली. सर्वांना संविधानाने संधीची समानता दिली असल्याने साऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण होत आहेत. मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमी विकासाचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात १०० कोटींपैकी ४० कोटींचा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे वळता केला. प्रशासकीय मान्यता दिली.

Devendra Fadanvis
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

मात्र अडीच वर्षांत हा निधी खर्च झाला नाही. आता नव्याने १९० कोटींचा आराखडा तयार केला आहे. पंधरा दिवसांत आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी या वेळी दिली. रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे खुमासदार शैलीत पावसाच्या धारा बरसल्या असल्या तरी त्या वैचारिक आहेत, असे सांगत फडणवीस आणि गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गवई यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एन. आर. सुटे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

२०२४ मध्ये इंदू मिलच्या जागेवर स्मारक तयार

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळत नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी हजारो कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. एक रुपया घेतला नाही. तिथे काम ही सुरू झाले असून, २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्यात येईल. लंडनमध्ये ज्या निवासात बाबासाहेब राहिले ते घर सरकारने विकत घेतले. तेथे स्मारक उभारले.

संविधानाप्रमाणे बौद्ध धम्म महत्त्वाचा ः गडकरी

बुद्धाचे तत्त्वज्ञान विश्‍वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व विश्‍वाच्या कल्याणाचा आहे. हाच समता आणि बंधुतेचा आधार आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांच्या कार्याची तुलना जगातील अमेरिकेतली ल्यूथरकिंगसोबतच होऊ शकते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com