Onion Rate : कांदाप्रश्‍नी सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन

या वर्षी बाजारात आलेला लाल व रांगडा कांदा, तसेच रब्बी कांद्याचे पीक अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झालेली आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Onion Market Update श्रीरामपूर, जि. नगर : या वर्षी बाजारात आलेला लाल व रांगडा कांदा, तसेच रब्बी कांद्याचे पीक (Rabi Onion) अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात (Onion Rate) प्रचंड घसरण झालेली आहे. परंतु सत्तासंघर्षात राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांवरील संकटाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

जगभर कांद्याला चांगली मागणी असताना कांदा निर्यातीला चालना देण्याऐवजी शेतकऱ्यांना डुबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघर्ष समितीने केला आहे. शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवार (ता. ६)पासून होळी सणाचे औचित्य साधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

Onion Rate
Onion Rate : नाफेडची कांदा खरेदी सुरू करा; भुजबळांनी केली सभागृहात मागणी

शेतकऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात, घरादाराला व दुकानांना तसेच दुचाकी, ट्रॅक्टर इत्यादी साधने तसेच सरकारी बसेस व रेल्वे, तसेच सरकारी कार्यालयाला कांद्याच्या माळा घालून सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे.

सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरून कांदा आंदोलनाची तीव्रता वाढवावी, होळी सणाच्या दिवशी आपापल्या तहसील कार्यालयाला कांद्याच्या माळा अर्पण करून निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघर्ष समितीने केले आहे.

समितीच्या मागण्या...

- कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान २५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा.

- कमी दराने खरेदी झालेल्या लाल व रांगडा कांद्याला फरकाचे अनुदान मिळावे.

- कांदा निर्यातीस तातडीने चालना मिळावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com