मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे

सद्गुरू जग्गी वासुदेव ‘सेव्ह सॉईल’ मोहिमेअंतर्गत नाशिककरांशी संवाद
मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे
Jaggi WasudevAgrowon

नाशिक : सगळेच किंबहुना एकूणच चराचर सृष्टी मातीपासूनच बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ही सृष्टी, जैवविविधता जगवायची असेल तर जागतिक पातळीवर ऱ्हास होत असलेल्या मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे; अन्यथा काही वर्षांत आपल्याला तशी संधीही मिळणार नाही, असा इशारा ईशा फाउंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी दिला.

‘माती वाचवा’ हा संदेश देण्यासाठी सदगुरू यांची दुचाकीवरून जगभ्रमंती सुरू आहे. शनिवार (ता.११) रोजी ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेअंतर्गत नाशिककरांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजक जनक सारडा व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती होती.

Jaggi Wasudev
सोलापूर- शेतीचं उत्पन्न नव्हे, खर्च पोचला दुप्पटीवर

सदगुरू म्हणाले, की मनुष्य अन्य प्राणिमात्रांपेक्षा हुशार न असला, तरी त्याची हुशारीच त्याच्यासह संपूर्ण सृष्टीच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. मातीचा ऱ्हास करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. मात्र, एक इंच माती निर्माण करायची झाली,तरी हजारोनवर्षे निघून जातील. या पार्श्वभूमीवर आपण आतापर्यंत जागतिक पातळीवर जमिनीवरील तब्बल १८ इंच माती नष्ट केली आहे. त्याचे अत्यंत भयानक परिणाम आपल्याला आणि आपल्या पुढील सर्वच पिढ्यांना भोगायला लागतील. ज्येष्ठ पत्रकार डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सूत्रसंचालन केले.

माती वाचविण्यासाठी शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेवायला हवे

मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही, तेव्हा पृथ्वीवरील माती वाचलीच पाहिजे. मातीत कमीतकमी ३ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. अन्न हे फजत शेतीतून मिळते, त्यामुळे मातीला पर्याय नाही.अन्नाची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे, त्यामुळे पैसे, सोनेनाणे काहीही उपयोगाचे नसेल. हे संकट रोखायचे असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.यामध्ये सरकारची महत्त्वाची भूमिका आहे.यासाठी माती वाचविण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. ज्यात शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकऱ्याना प्रोत्साहित करायला हवे जेणेकरून मातीची गुणवत्ता कायम ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com