Weather Update : राज्यात आजही पावसाची शक्यता कायम

मॉन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा काहीसा अडखळला असतानाच राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) पुन्हा काहीसा अडखळला असतानाच राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. आज (ता. १०) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची अंदाजही हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

संपूर्ण वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा रविवारी (ता. ९) कायम होती. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

Weather Update
Weather Update : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम

अग्नेय अरबी समुद्रापासून ईशान्य राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

गेले दोन-तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारी (ता. ९) राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला होता. पावसाची उघडीप असली तरी उकाडा कायम होता. आज (ता. १०) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com