जोरदार माॅन्सून सरींची प्रतिक्षा कायम

देशाच्या अनेक भागांत सध्या पाऊस पडत आहे. मात्र माॅन्सूनने अद्याप निम्मा देश व्यापलेला नाही. मात्र उत्तरेतील माॅन्सून न पोचलेल्या राज्यांतही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

माॅन्सूनचा (Monsoon) मुक्काम सोमवारपासून एकाच भागात कायम आहे. शनिवारीही माॅन्सूनची (Monsoon Update) सीमा पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा आणि चुर्क या भागांत कायम होती. तर राज्यात माॅन्सूनच्या सरी (Monsoon Rain) पडत आहेत. आज कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने हजेरी (Rainfall) लावली.

Monsoon Update
चांगली ओल असल्याशिवाय सोयाबीन पेरणी करू नका!

देशाच्या अनेक भागांत सध्या पाऊस पडत आहे. मात्र माॅन्सूनने अद्याप निम्मा देश व्यापलेला नाही. मात्र उत्तरेतील माॅन्सून न पोचलेल्या राज्यांतही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, कडधान्य, कापूस लागवडी सुरु केल्या. तर महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या. शनिवारी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा जिह्यांत ठिकाठकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली. तर मराठवाडा आणि विदर्भातील सर्वंच जिल्ह्यांतील काही भागांत विजांसह पाऊस झाला. राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र सार्वत्रिक जोरदार पाऊस झाला नाही. तर उद्या, म्हणजेच रविवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहिर केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com