Rain : ‘काटेपूर्णा’चा साठा ८० टक्क्यांवर

अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांत २७७ दलघमी पाणीसाठा
Katepurna Water Project
Katepurna Water ProjectAgrowon

अकोला ः आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांत प्रामुख्याने धरण क्षेत्रात पाऊस (Rain In Dam Area) झाल्याचा परिणाम सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णामध्ये (Water Stock In Katepurna Water Project) वेगाने साठा वाढला. हा प्रकल्प ऑगस्टच्या सुरुवातीलाच ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे सातत्याने पाण्याचा विसर्ग (Discharge Of Water) सुरू ठेवावा लागत आहे.

Katepurna Water Project
Water Management : पाऊस पाण्याचे योग्य नियोजन

या भागात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसला तरी मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात झाल्याचा फायदा प्रकल्पांना अधिक प्रमाणात झाला. काटेपूर्णा प्रकल्पाचे क्षेत्र हे मालेगाव (जि. वाशीम) तालुक्यात मोडत असून त्या भागात दोन दिवसांपूर्वी ढगफुटीसारखा पाऊस झाला. परिणामी, सर्व नदी-नाल्यांना पूर आले. यापैकी बरेच पाणी काटेपूर्णा प्रकल्पातही आले. त्यामुळे ८६.३५ दलघमी उपयुक्त साठा असलेल्या या प्रकल्पाची पातळी ६९.८० दलघमीवर पोहोचली. ८०.८३ टक्के इतका हा साठा झालेला आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पातही पाणी झपाट्याने वाढले. या धरणाचा क्षेत्र हे सातपुड्यात असून, त्या भागात पाऊस झाला. सध्या वाण प्रकल्पातील साठा ५९.८१ दलघमी झाले. या धरणाचा उपयुक्त साठा हा ८१.९५ दलघमी आहे. सध्या उपयुक्त साठ्याच्या तुलनेत ७१.९८ टक्के साठा बनलेला आहे.

Katepurna Water Project
Water Testing : सिंचनाच्या पाण्याची तपासणी आवश्यक

मोर्णा, निर्गुणा १०० टक्के

जिल्ह्यातील महत्त्वाच्या मध्यम प्रकल्पातही साठा चांगला झाला. प्रामुख्याने पातूर तालुक्यातील मोर्णा, निर्गुणा हे प्रकल्प १०० टक्के भरले. मोर्णामध्ये ४१.४६ दलघमी, तर निर्गुणामध्ये २८.८५ दलघमी साठा झाला. या दोन्ही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात ८६.५२ टक्के साठा आहे. अकोला जिल्ह्यात सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा तयार झाला असल्याने सर्व प्रकल्प मिळून २७७ दलघमी साठा निर्माण झाला. याची ७९.७९ टक्केवारी आहे.

रब्बीसाठी लाभदायी

गेल्या वर्षात जिल्ह्यातील प्रकल्प तुडूंब भरले होते. सलग तिसऱ्या वर्षी हे प्रकल्प भरले आहेत. यंदाही पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com