‘अपुऱ्या माहितीवर ग्रामसेवकांचा अवमान करणे थांबवा’

विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत भाषण करताना आमदार प्रशांत बंब यांनी ग्रामीण भागात मुख्यालयात न राहता शिक्षक व ग्रामसेवक घरभाडे भत्ता वसूल करतात, असा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे.
Prashant Bamb
Prashant BambAgrowon

नगर : विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत (Maharashtra Assembly Session) भाषण करताना आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी ग्रामीण भागात मुख्यालयात न राहता शिक्षक व ग्रामसेवक (Gramsevak) घरभाडे भत्ता वसूल करतात, असा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. हे बोलणे म्हणजे अपुऱ्या माहितीवर ग्रामसेवकांचा अवमान करणे आहे. ग्रामसेवकांचा अवमान करणे थांबवा, अशी मागणी ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली.

Prashant Bamb
Rural Development : गावे व्हावीत आत्मनिर्भर

एकनाथ ढाकणे व प्रशांत जामोद यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राज्यात केंद्र व राज्य सरकारच्या योजना गावपातळीवर पोहचविण्यासाठी ग्रामसेवक २४ तास कार्यरत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास साधला जात आहे. जाण्यासाठी रस्ता नाही, ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, ज्या ठिकाणी आदिवासी नक्षलग्रस्त भाग आहे. अशा ठिकाणी उपेक्षित समाजाची अहोरात्र प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनेने ग्रामसेवक सेवा करतात.

Prashant Bamb
Rural Development : शाश्वत ग्राम विकासाच्या ध्येयाची अंमलबजावणी

केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोच करण्याचे कार्य ग्रामसेवक सतत २४ तास कार्यरत राहून करत आहेत. असे असताना फक्त ग्रामसेवक मुख्यालय राहत नाहीत. या मुद्द्याचा बागुलबुवा करून त्यांचा अपमान करणे, त्यांच्या कार्याची उपेक्षा करणे त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. आज राज्यामध्ये ग्रामसेवकांची जवळपास पाच ते सहा हजार पदे रिक्त आहेत.

एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे. ग्रामसेवकांना ग्रामविकास विभागाशिवाय महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाची अतिरिक्त कामे करावी लागतात. याचा आपणास विसर पडलेला आहे का? प्रत्येक विभागाचे महसूल, शिक्षण, आरोग्य, वन, सहकार, ग्रामविकास यासह अन्य विभागांच्या विविध विकास कमिट्या, अभियान कमिट्या, स्थायी समिती यांचे सदस्य सचिव ग्रामसेवक आहेत. यांच्यावर अन्याय होत आहे हे आपणास दिसलेले नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करत ग्रामसेवकांचा अवमान थांबवण्याची मागणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com