Pune Rain Update : पुणे जिल्‍ह्याला वादळी पाऊस आणि गारांचा तडाखा

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद या भागात शनिवारी दुपारी गारांचा वर्षाव झाला. निमगाव सावा भागात शेतात अक्षरशः गारांचा खच पडला होता.
Hailstorm
HailstormAgrowon

Pune Rain Update ः शनिवारी (ता. १८) सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारांच्या तडाख्याने (Hailstorm) जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावातील पिकांना फटका बसला आहे.

यामुळे शेत शिवारासह उभ्या पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे (Crop Damage Survey) आदेश प्रशासनाला प्राप्त नसल्याचे प्रशासन सांगत असून, नुकसानीच्या पाहणीचे आदेश दिले असले, तरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनाम्यांना उशीर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद या भागात शनिवारी दुपारी गारांचा वर्षाव झाला. निमगाव सावा भागात शेतात अक्षरशः गारांचा खच पडला होता.

गारांच्या तडाख्यामुळे या भागातील काढणीस तयार असलेल्या गहू, कांदा, डाळिंब, कलिंगड, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नारायणगाव परिसरात पाऊस झाला, मात्र सुदैवाने गारा झाल्या नाहीत.

पावसामुळे नारायणगाव परिसरात निर्यातक्षम द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केली आहे.

Hailstorm
Crop Damage Survey : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतंची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद भागात गारांचा पाऊस झाला. निमगाव सावा भागामध्ये गारांचे प्रमाण जास्त होते. शेतामध्ये अक्षरशः गारांचा खच पडला होता.

गारांच्या तडाख्यामुळे काढणीस आलेला गहू, कांदा, डाळिंब, कलिंगड या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांमुळे कलमी आंब्यांना लागलेला मोहर व लहान फळे खाली गळून पडली.

Hailstorm
Crop Damage : दोन जिल्ह्यांत १६ हजार ३५ हेक्टरवर नुकसान

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा या परिसराला शनिवारी (ता. १८) सायंकाळी गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला असून, रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला आहे

गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे मंगेश नवले यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील तोडणीला आलेल्या खरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले.

जारकरवाडी येथील बढेकरमळा, ज्ञानेश्वरवस्ती येथेही जोरदार गारपीट झाली. गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले. मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Hailstorm
Crop damage Compensation : नुकसानग्रस्तांना हेक्टरी २५ हजार मदत द्या

इंदापूर तालुक्यातील भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ आदी गावांमध्ये शनिवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला.

त्यामुळे काढणीस आलेल्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा, द्राक्ष आदी फळबागांनाही या पावसाचा फटका बसला. विविध गावांमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली.

सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या खरीपाच्या ज्वारी, गहु, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भिगवण व परिसरामध्ये द्राक्ष, आंबा आदींच्या फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. पावसामुळे फळबागांचेही नुकसान होणार असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

सहा एकर कलिंगड पुढील आठ दिवसांत काढणीस तयार झाली असती. मात्र, आज झालेल्या गारपिटीने कलिंगड फळांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

- संदीप पवार, निमगाव सावा (ता. जुन्नर)

पंचनामा करण्याचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत, मात्र गारपीट झालेल्या भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- रवींद्र सबनीस, तहसीलदार जुन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com