Crop Damage : खानदेशात वादळी पावसाने नुकसान

खानदेशात मागील दोन - तीन दिवसांपासून अनेक भागात रोज दुपारी वादळी पाऊस होत आहे. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस होत असून, यामुळे जमिनी खरडून जात असून, केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

जळगाव ः खानदेशात मागील दोन - तीन दिवसांपासून अनेक भागात रोज दुपारी वादळी पाऊस (Stormy Rain) होत आहे. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस (Rain Like Cloudburst) होत असून, यामुळे जमिनी खरडून (Agriculture Land Wash Away) जात असून, केळी बागा भुईसपाट (Banana Crop Damage) झाल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातही सलग दोन दिवस म्हणजेच शुक्रवारी (ता.३० सप्टेंबर) व शनिवारी (ता.१) जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पिंगाने (ता. शहादा) येथे झालेल्या वादळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. वादळाच्या तीव्रतेने पपई, कापूस, मिरची, ऊस आदी पिके जमीनदोस्त झाले.

Crop Damage
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

त्यात शेतकरी संजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, हेमलता पाटील, राकेश चौधरी, कैलास पाटील यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लगतही मोठी हानी झाली आहे. कापूस वेचणी ठप्प झाली असून, एकरी दोन ते अडीच क्विंटल कापूस हातचा गेला आहे. तसेच शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातही मध्यम पाऊस झाला असून, यामुळे मळणी, काढणीच्या कामांवर परिणाम झाला आहे.

Crop Damage
Crop Damage : निसर्गाचा प्रकोप अन् शेती

कापडणे (ता.जि.धुळे) व परिसरात शुक्रवारी व रविवारी (ता.२) जोरदार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळित झाले. तसेच पिकांची हानी झाली आहे. परिसरात कांद्याची लागवड झाली होती. परंतु कांद्याचेही नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी वित्तीय संकटात सापडला आहे. तसेच कापूस, ज्वारी, मका आदी पिके लोळली आहेत. वादळामुळे कापूस पीकही लोळले असून, त्याची वेचणी करणे शक्य होणार नाही, अशी स्थिती आहे.

पावसाने कापणीत व्यत्यय..

जळगाव जिल्ह्यातही पश्चिम भागात मध्यम पाऊस व सुसाट वारा, असा पाऊस झाला आहे. अतिवृष्टी कुठेही झालेली नाही. परंतु मागील तीन दिवस सतत पाऊस झाला आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

ज्वारी, मका कापणीवर आले आहेत. त्यात कापणी व मळणीसाठी कोरडे, सूर्यप्रकाशीत वातावरण हवे आहे. तसेच सोयाबीनची मळणीदेखील सुरू आहे. कापूस वेचणी मध्यंतरी वेगात सुरू झाली. परंतु अनेक भागात पावसाने व्यत्यय आला आहे. शेतकरी चिंतेत असून, पाऊस थांबून, स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com