Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
Weather Update पुणे : उन्हाचा चटक्यामुळे कोकणात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. १३) राज्यात वादळी पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) व कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट आली होती.
रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.
दरम्यान, पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. १३) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.२ (१६.७), जळगाव ३६.५ (१५.५), धुळे ३५.५ (१३), कोल्हापूर ३४.४ (२१.५), महाबळेश्वर २९.६ (१७.९), नाशिक ३२.९ (१५.६), निफाड ३४(१२), सांगली ३४.५ (२१.१), सातारा ३४.९ (१९.२), सोलापूर ३६.५ (२२.७),
सांताक्रूझ ३८.५ (२४.१), डहाणू ३२.३ (२३.६), रत्नागिरी ३६.९ (२३.१), छत्रपती संभाजीनगर ३४.५ (१४.८), नांदेड ३६.० (१९.४), परभणी ३५(१९), अकोला ३७.३ (१७.७), अमरावती ३६.४(२०.१), बुलडाणा ३४(१९.४),
ब्रह्मपुरी ३८ (१९), चंद्रपूर ३६.६ (१९.६), गडचिरोली ३५.६(१६.८), गोंदिया ३५.८ (१६.५), नागपूर ३५.२ (१७.३), वर्धा ३६(२०.४), वाशीम ३६ (१९.८), यवतमाळ ३५.५ (१७.५).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.