Strawberry Season : स्ट्रॉबेरीचा हंगाम पावसामुळे लांबणीवर

पाऊस लांबल्याने पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणीच स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली.
Strawberry Season
Strawberry SeasonAgrowon

ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम (Strawberry Season) सुरू होतो. यंदा, मात्र पाऊस लांबल्याने पाचगणी (Pachgani) आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणीच स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Cultivation) करण्यात आली असल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

Strawberry Season
Rabbi Season : मोहरी लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून ऑक्टोबरअखेर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात स्ट्रॅाबेरीचे फक्त ५० बॉक्स दाखल होत आहेत. अशातच यंदा पाऊस लांबल्याने उशिरा लागवड झाली आहे; तर आधी लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने स्ट्रॅाबेरी उशिरा दाखल होणार आहे.

Strawberry Season
Rabbi Season : महाराष्ट्रातही मोहरीची लागवड फायदेशीर

आवक घटल्याने यंदा चढे दर

स्ट्रॉबेरीचे उत्पादन निघण्यासाठी दोन ते अडीच महिने कालावधी लागतो. त्यामुळे अद्याप लागवड न झालेल्या उत्पादनाला जानेवारी महिना उजाडेल, तर लागवड झालेले उत्पादन डिसेंबरमध्ये बाजारात दाखल होईल. त्यामुळे आवक कमी असल्यामुळे पाव किलोला ३०० ते ४०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com