Mosambi Orchard : मोसंबी बागांमध्ये ताण तोडण्याचे काम सुरू

मराठवाड्यातील मोसंबीचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील मोसंबी बागामध्ये सद्यःस्थितीत ताण तोडण्याचे काम सुरू आहे.
Mosambi Orchard
Mosambi OrchardAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीचे हब (Mosambi Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील मोसंबी बागामध्ये (Mosambi Orchard) सद्यःस्थितीत ताण तोडण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे काही प्रमाणात झाडांवर असलेल्या मृग बहराची मोसंबीची फळेही पक्वतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

Mosambi Orchard
Mosambi Orchard : मोसंबीतून आर्थिक स्थैर्य शक्य

मराठवाड्यात जवळपास ४१ हजार १९३ हेक्टर वर मोसंबीच्या बागा आहे. त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात आहेत. लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत जवळपास २३९५ हेक्‍टरवर मोसंबी बागांचा विस्तार झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. मराठवाड्यात साधारणतः आंबिया बहर मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जातो. काही प्रमाणात मृग बहरही शेतकरी घेतात.

Mosambi Orchard
Mosambi Management : मोसंबी झाडांची रोगप्रतिकारकता वाढवा

यंदा अखेरच्या टप्प्यातील अतिपावसाने मोसंबी बागांमधील ताणाचे गणित बिघडले होते. आताच्या घडीला शेतकरी मोसंबी बागांना खताचा डोस देण्यासह ताण तोडण्याचे काम करीत आहेत. काही ठिकाणी बागांना शेतकऱ्यांकडून दोन ते तीन पाणी ही देऊन झाले आहे. तर काही ठिकाणी आताच्या घडीला ताण तोडण्यासाठी पाणी दिले जाते आहे. या आधीच ताण तोडल्या गेलेल्या बागांमध्ये काही प्रमाणात फुले दिसू लागली आहेत.

मागच्या वर्षी मृग बहर फुटला नाही, परंतु यंदा काही प्रमाणात झाडांवर मृग बहर आहे. खत टाकून मेहनत करणे व दोन-तीन दिवसांपासून बागांना पाणी देऊन ताण तोडण्याचे काम सुरू आहे.

- मदनराव शिंदे, रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

पाच एकरांवर मोसंबी बाग आहे. २० टक्के आंबे बहर असून, ८० टक्के आंबिया बहर आहे.

- राम तारक, अंतरवली, जि. जालना

...

पाच एकर उत्पादनक्षम मोसंबी बागेला आतापर्यंत ताण दिला होता. २५ डिसेंबरपासून ताण तोडून पाणी देणे सुरू केले आहे.

- शिवाजीराव चव्हाण,

ममदाबाद, जि. जालना

सद्यःस्थितीत मोसंबीच्या आंबिया बहराचा ताण तोडणे सुरू असून, आंबवणी पाणी देण्याचे काम चालू आहे. मृग बहराच्या फळांची वाढ सुरू आहे.

- डॉ. संजय पाटील,

प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com