Fertilizer : खतांच्या लिंकिंगविरोधात व्यावसायिकांचा बंद

खत कंपन्यांकडून प्रमुख खतांच्या विक्रीबरोबर दुसऱ्या अनावश्‍यक खतांची विक्री (लिकिंग) केली जाते. अशा लिकिंगप्रकाराच्या निषेधार्थ जुन्नर (जि.पुणे) तालुक्यातील शिवनेरी ॲग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (ता.२९) एक दिवसीय बंद पुकारण्यात आला.
Fertilizer
FertilizerAgrowon

पुणे ः खत कंपन्यांकडून प्रमुख खतांच्या विक्रीबरोबर दुसऱ्या अनावश्‍यक खतांची विक्री (लिकिंग) (Fertilizer Linking) केली जाते. अशा लिकिंगप्रकाराच्या निषेधार्थ जुन्नर (जि.पुणे) तालुक्यातील शिवनेरी ॲग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (ता.२९) एक दिवसीय बंद (Strike Against Fertilizer Linking) पुकारण्यात आला. यामध्ये तालुक्यातील सुमारे २६० लहान-मोठ्या कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अजित वाजगे यांनी दिली.

Fertilizer
Fertilizer : लिंकिंगला विरोध करताच तपासणी मोहीम

याबाबत बोलताना वाजगे म्हणाले, ‘‘खत विक्रेत्या कंपन्या प्रमुख खतांबरोबर अन्य अनावश्‍यक खतांची विक्री करण्यासाठी सक्ती करतात. प्रमुख खताच्या किमतीएवढीच अन्य खते खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जाते. गरज नसताना अन्य खतांची खरेदी करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा अनावश्‍यक खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

याच्या निषेधार्थ आम्ही २६० कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद पुकारला होता. तसेच, खतांच्या महागड्या किमतीविरोधात, तसेच लिकिंग प्रकाराविरोधात केंद्र सरकारने खते उत्पादक कंपन्यांवर कडक नियम लावण्याची गरज आहे,’ असेही वाजगे म्हणाले.

खतांच्या लिंकिंगमुळे अनावश्‍यक खतांची खरेदी शेतकऱ्यांना करावी लागते. शेतमालाचा उत्पादन खर्च वाढत असताना, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? सरकारने तातडीने लिंकिंगवर बंदी आणली पाहिजे.
राकेश पांडव, उपाध्यक्ष जुन्नर शहर डीलर्स असोसिएशन

नारायणगाव, जि. पुणे ः रासायनिक खतांच्या लिकिंगच्या निषेधार्थ शिवनेरी ॲग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनच्या वतीने लिंकिंगच्या विरोधात सोमवारी (ता.२९) एक दिवसीय बंद पुकारण्यात आला. यामुळे कृषिसेवा केंद्रे बंद होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com