Old Pension Scheme : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवार (ता. १४) पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला.
Old Pension Scheme Protest
Old Pension Scheme ProtestAgrowon

Old Pension Scheme अकोला ः जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवार (ता. १४) पासून राज्यव्यापी बेमुदत संप (Protest For Old Pension) सुरू झाला. या संपात येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (PDKV Akola) अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. शेकडोच्या संख्येने एकत्र येत या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली.

जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.

Old Pension Scheme Protest
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबद्दल हेरंब कुलकर्णी यांची वेगळी भूमिका

त्यानुसार मंगळवारी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.

बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवले.

Old Pension Scheme Protest
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी संपामुळे कृषीसह संलग्न सेवा ठप्प

कृषी विभागातही शुकशुकाट

बेमुदत संपात कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात शुकशुकाट पसरला. या कार्यालयात केवळ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हेच कक्षात उपस्थित होते. उर्वरीत सपूर्ण कार्यालयात कुठलाही अधिकारी, कर्मचारी नव्हता. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातही अशीच स्थिती होती.

सर्व संघटनांचा भव्य मोर्चा

या बेमुदत संपात सुमारे ७० पेक्षा अधिक संघटनांनी सहभाग घेतल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. जिल्हा मुख्यालयात या संघटनांनी रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढला.

सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com